गोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात अडकली दोन लाख टन साखर

सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५ पासून यातून बाहेर पडलेला नाही. सद्यःस्थितीत राज्यात तब्बल ९० लाख टन साखर कारखान्यांच्या गोदामांमध्ये पडून असून देशाअंतर्गत विक्री आता कोरोनाच्या लॉकडाउनमुळे घटली आहे.
गोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात अडकली दोन लाख टन साखर
गोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात अडकली दोन लाख टन साखर

सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५ पासून यातून बाहेर पडलेला नाही. सद्यःस्थितीत राज्यात तब्बल ९० लाख टन साखर कारखान्यांच्या गोदामांमध्ये पडून असून देशाअंतर्गत विक्री आता कोरोनाच्या लॉकडाउनमुळे घटली आहे. अशातच २० मार्चपासून निर्यातही बंद आहे. निर्यातीसाठी निघालेली दोन लाख टन साखर कोरोनामुळे बंदरांमध्ये अडकून पडली असून शिल्लक साखरेमुळे कारखानदारांसमोर अडचणीचा डोंगर उभा राहिला आहे. महाराष्ट्रातील साखर इराण, इंडोनेशिया, चीन, सौदी अरेबिया, दुबईसह मध्य पूर्व आशिया देशांमध्ये निर्यात केली जाते. २०१७-१८ मध्ये राज्यातून १३ लाख टन तर २०१८-१९ मध्ये १६ लाख टन साखरेची निर्यात झाली होती. २०१९-२० मध्ये २० लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्टे केंद्र सरकारने दिले होते, परंतु आत्तापर्यंत त्यातील सात लाख टन साखर निर्यात झाली आहे. १ ऑक्‍टोबरपर्यंत उद्दिष्टपूर्तीचे आव्हान असून देशाअंतर्गत साखर दरमहा सात लाख टनांपर्यंत विक्री होणे अपेक्षित असतानाही कोरोनामुळे विक्रीत घट झाली आहे. आता सप्टेंबर २०२० पर्यंत सुमारे ३० लाख टन साखर विक्रीचे उद्दिष्टे असल्याची माहिती उपपदार्थ विभागाचे सहसंचालक डॉ. संजयकुमार भोसले यांनी दिली. दरम्यान, मागील तीन वर्षांपासून राज्यातील साखरेचे उत्पादन खपापेक्षा अधिक होत आहे. दरवर्षी २५ ते ३५ लाख टन इतकी साखर शिल्लक राहत असल्याचेही ते म्हणाले. 

राज्यात सद्यःस्थितीत ९० लाख टन साखर शिल्लक असून लॉकडाउननंतर निर्यात बंद आहे. २०१९-२० मध्ये २० लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्टे होते, परंतु त्यांपैकी १३ लाख टन साखर निर्यात झालेली नाही. निर्यात बंद आणि साखरेची मागणी घटल्याने कारखानदारांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. - डॉ. संजयकुमार भोसले, सहसंचालक, उपपदार्थ, साखर आयुक्‍तालय

मागील वर्षी निर्यात केलेल्या साखरेचे साडेसात कोटी रुपयांचे अनुदान मिळालेले नाही. कारखाने निर्यातीसाठी इच्छुक असतानाही बॅंकांकडून घेतलेली साखरेवरील उचल रक्‍कम व बाजारातील भाव, यातील साडेपाचशे रुपयांची मार्जिन रक्‍कम देण्यासाठी पैसे शिल्लक नसल्याने साखर उचलता येत नाही. त्यामुळे अनुदान वेळेत मिळावे व रिझर्व्ह बॅंकेने बॅंकांकडून मार्जिन रकमेसाठी सवलत द्यावी. - राजन पाटील, लोकनेते साखर कारखाना (ता. मोहोळ), अध्यक्ष राज्यातील साखर साठ्याची स्थिती

  • शिल्लक साखर : ९०.२८ लाख टन
  • निर्यात करावयाची साखर : १३ लाख टन
  • सप्टेंबरपर्यंत देशाअंतर्गत विक्रीचे नियोजन : ३० लाख टन
  • विक्रीनंतरही शिल्लक राहणारा साठा : ५० लाख टन
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com