agriculture news in marathi 90 lakh ton sugar in godowns of maharashtra | Agrowon

गोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात अडकली दोन लाख टन साखर

तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५ पासून यातून बाहेर पडलेला नाही. सद्यःस्थितीत राज्यात तब्बल ९० लाख टन साखर कारखान्यांच्या गोदामांमध्ये पडून असून देशाअंतर्गत विक्री आता कोरोनाच्या लॉकडाउनमुळे घटली आहे.

सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५ पासून यातून बाहेर पडलेला नाही. सद्यःस्थितीत राज्यात तब्बल ९० लाख टन साखर कारखान्यांच्या गोदामांमध्ये पडून असून देशाअंतर्गत विक्री आता कोरोनाच्या लॉकडाउनमुळे घटली आहे. अशातच २० मार्चपासून निर्यातही बंद आहे. निर्यातीसाठी निघालेली दोन लाख टन साखर कोरोनामुळे बंदरांमध्ये अडकून पडली असून शिल्लक साखरेमुळे कारखानदारांसमोर अडचणीचा डोंगर उभा राहिला आहे.

महाराष्ट्रातील साखर इराण, इंडोनेशिया, चीन, सौदी अरेबिया, दुबईसह मध्य पूर्व आशिया देशांमध्ये निर्यात केली जाते. २०१७-१८ मध्ये राज्यातून १३ लाख टन तर २०१८-१९ मध्ये १६ लाख टन साखरेची निर्यात झाली होती. २०१९-२० मध्ये २० लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्टे केंद्र सरकारने दिले होते, परंतु आत्तापर्यंत त्यातील सात लाख टन साखर निर्यात झाली आहे.

१ ऑक्‍टोबरपर्यंत उद्दिष्टपूर्तीचे आव्हान असून देशाअंतर्गत साखर दरमहा सात लाख टनांपर्यंत विक्री होणे अपेक्षित असतानाही कोरोनामुळे विक्रीत घट झाली आहे. आता सप्टेंबर २०२० पर्यंत सुमारे ३० लाख टन साखर विक्रीचे उद्दिष्टे असल्याची माहिती उपपदार्थ विभागाचे सहसंचालक डॉ. संजयकुमार भोसले यांनी दिली.

दरम्यान, मागील तीन वर्षांपासून राज्यातील साखरेचे उत्पादन खपापेक्षा अधिक होत आहे. दरवर्षी २५ ते ३५ लाख टन इतकी साखर शिल्लक राहत असल्याचेही ते म्हणाले. 

राज्यात सद्यःस्थितीत ९० लाख टन साखर शिल्लक असून लॉकडाउननंतर निर्यात बंद आहे. २०१९-२० मध्ये २० लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्टे होते, परंतु त्यांपैकी १३ लाख टन साखर निर्यात झालेली नाही. निर्यात बंद आणि साखरेची मागणी घटल्याने कारखानदारांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे.
- डॉ. संजयकुमार भोसले, सहसंचालक, उपपदार्थ, साखर आयुक्‍तालय

मागील वर्षी निर्यात केलेल्या साखरेचे साडेसात कोटी रुपयांचे अनुदान मिळालेले नाही. कारखाने निर्यातीसाठी इच्छुक असतानाही बॅंकांकडून घेतलेली साखरेवरील उचल रक्‍कम व बाजारातील भाव, यातील साडेपाचशे रुपयांची मार्जिन रक्‍कम देण्यासाठी पैसे शिल्लक नसल्याने साखर उचलता येत नाही. त्यामुळे अनुदान वेळेत मिळावे व रिझर्व्ह बॅंकेने बॅंकांकडून मार्जिन रकमेसाठी सवलत द्यावी.
- राजन पाटील, लोकनेते साखर कारखाना (ता. मोहोळ), अध्यक्ष

राज्यातील साखर साठ्याची स्थिती

  • शिल्लक साखर : ९०.२८ लाख टन
  • निर्यात करावयाची साखर : १३ लाख टन
  • सप्टेंबरपर्यंत देशाअंतर्गत विक्रीचे नियोजन : ३० लाख टन
  • विक्रीनंतरही शिल्लक राहणारा साठा : ५० लाख टन

इतर बातम्या
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ :...मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
अंतिम वर्षाची परीक्षा नाही :...मुंबई : सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या...
टोळधाडबाधितांना मदत देणार : पंतप्रधान...नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत टोळधाडीचे संकट...
पीकविम्याचे कामकाज या महिन्यातपुणे: राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...
दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या...परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत...