Agriculture news in Marathi 90% of paddy crop in Sindhudurg district is loamy | Page 2 ||| Agrowon

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना लोंबी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना लोंबी आली आहे. तर १० टक्के हळवी भातपिके परिपक्व झाली आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसांत झालेल्या शेती उपयुक्त पावसामुळे भातशेतीवरील संकट टळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना लोंबी आली आहे. तर १० टक्के हळवी भातपिके परिपक्व झाली आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसांत झालेल्या शेती उपयुक्त पावसामुळे भातशेतीवरील संकट टळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

जिल्ह्यात ५५ हजार हेक्टरवर भातशेतीची लागवड केली जाते. खरीप हंगामात भातशेतीचे अधिक प्रमाणात केली जाते. साधारणपणे तीन टप्प्यात पेरणी आणि भातरोपे लावणी होते. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा असते असे शेतकरी माॅन्सूनपूर्वी पाऊस पडण्याच्या अगोदर आठ ते दहा दिवस भिजवणीची पेरणी करतात. त्यानंतर माॅन्सूनपूर्व पाऊस पडल्यानंतर पेरणी केली जाते तर काही शेतकरी मृगाचा पाऊस पडल्यानंतर पेरणी करतात.

यावर्षी २० मे रोजी भिजवणीची पेरणी करण्यात आली. तर १ जून ते ४ जून या कालावधीत माॅन्सूनपूर्व पेरणी करण्यात आली. तर १० जूनच्या पुढे माॅन्सून सुरू झाल्यानंतर भात बियाणे पेरण्यात आले. त्यानंतर भातशेतीला अतिशय चांगला पाऊस झाला. रोपे लागवड करताना देखील शेतकऱ्यांचा खोळंबा पावसामुळे झालेला नाही. त्यामुळे भातरोपे लागवड वेळेत पूर्ण झाली. त्यानंतर सतत पाऊस झाला. त्यामुळे रोपांची वाढ चांगली झाली आहे. परंतु ऑगस्टच्या अखेरीस पावसाने दडी मारली सलग आठ ते दहा दिवस पाऊस गायब झाला. पावसाअभावी भातशेतीच्या जमिनीतील ओलावा कमी होऊ लागला होता. त्यातच करप्याचा प्रादुर्भाव भातपिकांवर झाला.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. भातशेती धोक्यात येण्यापूर्वी पाऊस झाला. त्यामुळे भातशेतीवरील मोठे संकट टळले. सध्या जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना लोंबी आलेली आहे. त्यातील १० टक्के भातबियाणे असल्याने ती परिपक्व झाली आहेत. परिपक्व झालेली भातशेती येत्या सहा ते सात दिवसांत कापणीला येण्याची शक्यता आहे. परंतु सध्या पावसाचे सावट आहे.


इतर ताज्या घडामोडी
काजूसाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना...ही योजना काजू पीक विम्यासाठी अधिसूचित कोल्हापूर,...
नाशिकमध्ये दोडका सरासरी ४१६५ रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
संरक्षित शेतीचे महत्त्वसंरक्षित शेतीमध्ये हरितगृह किंवा शेडनेटगृहाचा...
पोषक आहारासाठी बियाणे स्वावलंबन...येत्या काळात कमी पाण्यावर येणारी पिके बाजरी,...
सब्जा बियांचे आरोग्यदायी फायदे सब्जामध्ये प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने...
सांगली जिल्ह्यातील भाजीपाला पिके...सांगली ः सांगली जिल्ह्याची ओळख भाजीपाला...
सणासुदीत निष्काळजीपणा नको ः पंतप्रधान...नवी दिल्ली ः देशातील लॉकडाउन संपला तरी कोरोनाचा...
कांदा बियाण्यांचा काळाबाजार सुरूचनाशिक : मागील वर्षी उन्हाळ कांदा बीजोत्पादनावेळी...
लाचखोर तलाठ्यास कारावासवर्धा : सातबारावरील चूक दुरुस्तीसाठी पंधरा...
‘गोकूळ’ देणार दूध संस्‍थांना दरफरकापोटी...कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध...
केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे ३०...मुंबई : कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक...
बिहारला मदत, मग महाराष्ट्राला का नाही?...मंगळवेढा, जि. सोलापूर : केंद्र शासनाने बिहारमध्ये...
शेतकऱ्यांशी सरकारला देणेघेणे नाही ः...करमाळा, जि. सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे...
पिकांचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने...सोलापूर : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनाला...
सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ७५ महसूल...सोलापूर :  जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा...
सांगली जिल्ह्यात कृष्णाकाठावरील कृषिपंप...सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली...
रत्नागिरीत भातशेतीवर अस्मानी संकटरत्नागिरी : ‘‘ऑक्टोबर महिन्यातील मुसळधार...
नाशिक जिल्ह्यात मका विक्रीत...येवला, जि. नाशिक : सध्या बाजार समित्यांसह खासगी...
नुकसानपातळी अधिक, केंद्रानेही मदत करावी...नाशिक : ‘‘परतीच्या पावसामुळे कापणी योग्य झालेली...
रिसोड तालुक्यात सोयाबीनची हेक्टरी अडीच...रिसोड, जि. वाशीम ः  सततच्या पावसाने सोयाबीन...