agriculture news in marathi, 90 percent grapes season overs in Sangli District | Agrowon

सांगलीतील ९० टक्के द्राक्ष हंगाम उरकला
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 एप्रिल 2019

सांगली : जिल्ह्यातील यंदाचा द्राक्ष हंगाम ९० टक्के उरकला आहे. निर्यातक्षम द्राक्षाला सुरुवातीला अपेक्षित दर मिळाला नाही. मात्र नंतर चांगला दर मिळाला. स्थानिक बाजारात योग्य दर न मिळाल्यामुळे ३५ हजार एकर क्षेत्रातील शेतकरी बेदाण्याकडे वळले आहेत. हंगामाच्या अंतिम टप्प्यात द्राक्षाचे दर २० ते २५ रुपये प्रति किलोने वाढले असून सध्या द्राक्षाला २६० रुपये प्रतिचार किलो असा दर मिळत आहे.

सांगली : जिल्ह्यातील यंदाचा द्राक्ष हंगाम ९० टक्के उरकला आहे. निर्यातक्षम द्राक्षाला सुरुवातीला अपेक्षित दर मिळाला नाही. मात्र नंतर चांगला दर मिळाला. स्थानिक बाजारात योग्य दर न मिळाल्यामुळे ३५ हजार एकर क्षेत्रातील शेतकरी बेदाण्याकडे वळले आहेत. हंगामाच्या अंतिम टप्प्यात द्राक्षाचे दर २० ते २५ रुपये प्रति किलोने वाढले असून सध्या द्राक्षाला २६० रुपये प्रतिचार किलो असा दर मिळत आहे.

जिल्ह्यात यंदा पाऊसमान कमी झाल्याने टँकरच्या पाण्याने बागा जगवाव्या लागल्या. फळछाटणी एकाचवेळी झाली. फळधारणाही चांगली झाली. रोगांचा फारसा प्रादुर्भाव झाला नाही. बाजारात द्राक्षे एकाच वेळी आली. त्यानंतर थंडी आणि पाऊस यामुळे मालाला दक्षिणेतून मागणी वाढली नाही. त्याचा परिणाम दरावर झाला. सुरुवातीला चार किलोची पेटी २५० रुपयांना विकली गेली. त्यात नंतर मात्र १५० रुपयांपर्यंत घसरण झाली. द्राक्षाला अपेक्षित दर नसल्याने द्राक्षविक्री करण्याऐवजी बेदाणानिर्मिती करण्याकडे शेतकरी वळाले.

बेदाण्यासाठी सुमारे ३५ ते ४० हजार एकर क्षेत्रातील द्राक्षांचा वापर झाला. उत्पादन चांगले झाले असले, तरी दर तुलनेने कमीच राहिला, अशी माहिती द्राक्ष उत्पादकांनी दिली. सध्या बेदाण्याला प्रतिकिलोस १९० ते २२५ रुपये असा दर मिळत आहे. त्यामुळे बेदाण्याच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील दहा टक्के द्राक्षांची काढणी शिल्लक आहे. जिल्ह्यात द्राक्षे ठेवण्यासाठी शीतगृहांची संख्या कमी आहे. जी शीतगृहे आहेत, त्यामध्ये बेदाणा ठेवला जातो. त्यामुळे सध्या व्यापाऱ्यांनी द्राक्षाची खरेदी करून ती शीतगृहात ठेवली आहेत. याचा फायदा थेट व्यापाऱ्यांना होणार आहे. 

इतर बातम्या
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...