नगर : कांदा अनुदानासाठी ९१ हजार अर्ज

कांदा अनुदानासाठी ९१ हजार अर्ज
कांदा अनुदानासाठी ९१ हजार अर्ज

नगर ः कांद्याला भाव नसल्यामुळे राज्य सरकारने एक नोव्हेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना २०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे. या अनुदानातील एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या दीड महिन्यातील अनुदानाचा टप्पा पूर्ण झाला आहे. उर्वरित अडीच महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील दोन लाख ५१ हजार ५९१ शेतकऱ्यांनी ९१ हजार ३६१ अर्ज दाखल केलेले आहेत.

एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ असा अनुदानाचा कालावधी पहिल्यांदा ठरविण्यात आला होता. या पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांचे कांद्यासाठी अर्ज दाखल करून घेऊन त्यांना अनुदान देण्यात आले. मात्र, कांद्याला भाव न मिळाल्याने पुन्हा १६ ते ३१ डिसेंबर २०१८ असा पंधरा दिवसांचा कालावधी वाढविला; परंतु तरीही भाव न वाढल्याने जानेवारी व फेब्रुवारी २०१९ असा दोन महिन्यांचा कालावधी परत वाढविण्यात आला.

या अडीच महिन्यांत जिल्ह्यातील १४ बाजार समिती व प्रसन्न कृषी मार्केट (पाडळी आळे) अशा एकूण १५ ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी अर्ज दाखल केले. जिल्ह्यातील दोन लाख ५१ हजार ५९१ शेतकऱ्यांनी ९१ हजार ३६१ अर्ज दाखल केलेले आहेत. या अडीच महिन्यांत ४२ लाख दोन हजार ८६९ कांद्याची विक्री झालेली आहे.

नगर बाजार समितीत कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असून, अकोले बाजार समितीत सर्वाधिक कमी शेतकऱ्यांनी कांदा विक्री केलेला आहे. 

नगर ः ५९ हजार ७४२ शेतकऱ्यांनी २६ हजार ७७२, नेवासे ः ५७ हजार ८६२ शेतकऱ्यांनी १६ हजार ५३९, राहुरी ः ४० हजार ८०२ शेतकऱ्यांनी १३ हजार ९९९ अर्ज दाखल केले आहेत. अकोले तालुक्‍यात या अडीच महिन्यात ४४८ शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला असून, १२८ अर्ज दाखल केले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com