agriculture news in marathi 913 crore farmers compensation amount on hold due to election code on conduct in Nanded | Page 4 ||| Agrowon

नांदेड जिल्ह्यात आचारसंहितेने नुकसानग्रस्तांचे ९१३ कोटी ‘होल्ड’वर !

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 नोव्हेंबर 2021

नांदेड : जिल्ह्यातील साडेआठ लाख नुकसानग्रस्तांना भरपाईसाठीचे ९१३ कोटी रुपये निवडणूक आचारसंहितेमुळे सध्या ‘होल्ड’वर आहेत.

नांदेड : जिल्ह्यातील साडेआठ लाख नुकसानग्रस्तांना भरपाईसाठी नव्या निकषानुसार लागणाऱ्या ६११ कोटींपैकी ४५५ कोटी जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. तसेच पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत मंजूर झालेला ४५८ कोटींचा परतावा मंजूर आहे. असे एकूण ९१३ कोटी रुपये निवडणूक आचारसंहितेमुळे ही रक्कम सध्या ‘होल्ड’वर पडले आहेत.

जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती उद्‌भवली होती. यामुळे साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या सहा लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. याबाबत जुलै महिन्यातील नुकसान भरपाईसाठी प्रचलित दरानुसार ३० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. तर जुलै व ऑगस्टमध्ये नुकसान झालेल्यांसाठी ७५ टक्के भरपाईनुसार ४२५ कोटी, असे एकूण ४५५ कोटी जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. तसेच प्रधानमंत्री पीकविमा योजनेत खरीप हंगामात नऊ लाख दहा हजार शेतकऱ्यांनी सहा पिकांसाठी विमा भरून योजनेत सहभाग घेतला होता.

यामुळे नांदेडमधील शेतकऱ्यांना सात लाख २० हजार ४४३ शेतकऱ्यांना ४५८ कोटी ८९ लाख ७३ हजार ७११ रुपयांचा विमा परतावा मंजूर झाला आहे. या परताव्याची रक्कमही कंपनीस्तरावर प्रलंबित आहे. देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता पाच नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार असल्याने यानंतरच ९१३ कोटी रुपयांच्या वितरणाचा मार्ग मोकळा होईल, अशी सूत्रांनी दिली.

जुलैसाठी १४ कोटींची आवश्यकता
जुलैमधील नुकसान भरपाईबाबत प्रचलित दरानुसार ३० कोटी प्राप्त झाले आहेत. परंतु नव्या निकषानुसार ४४ कोटी रुपये लागतात. सध्या जिल्ह्याकडे ३० कोटी वाटपाचा प्रश्‍न पडला आहे. यामुळे वाढीव दरानुसार अतिरिक्त १४ कोटी रुपयांची गरज आहे. अतिरिक्त निधी वेळेवर आला नाहीत तर शेतकऱ्यांना भरपाई वितरित करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर अडचणी निर्माण होऊ शकतात.


इतर ताज्या घडामोडी
कवठेमहांकाळ तालुक्यात पिकाचे पंचनामे...घाटनांद्रे, जि. सांगली ः कवठेमहांकाळ तालुक्यात...
पुणे जिल्ह्यातील १ हजार शेतकरी होणार...पुणे ः जिल्ह्यात १ हजार शेतकरी कृषी निर्यातदार...
आजरा तालुक्यात यंदा ३०० हेक्टरवर रब्बी...आजरा, जि. कोल्हापूर आजरा तालुक्यात जमिनीला वापसा...
नांदेड जिल्ह्यात अवकाळीचा दोन हजार...नांदेड : जिल्ह्यात २९ डिसेंबर रोजी झालेल्या...
शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य...यवतमाळ : शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य...
अनुकूल स्थिती होताच शर्यतींना परवानगी ः...पुणे ः ‘‘राज्यात कोविडमुळे काही भागांमध्ये...
मोदी म्हणाले, शेतकरी माझ्यासाठी मेलेत...चंडीगड ः मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे...
रब्बी पीक हानीबाबत पूर्वसूचना दाखल करापुणे ः राज्यात खरिपानंतर आता रब्बी हंगामातील...
थंडी कमी, तापमानात वाढपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
सिंधुदुर्गात ऊसतोड रखडलीसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील ऊसशेती तोडणी अभावी...
कळमनामध्ये सोयाबीनची आवक मंदावलीनागपूर ः दरातील तेजीच्या अपेक्षेने कळमना...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक घटली; दर स्थिरनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...
जालन्यात तुरीची सर्वाधिक आवकजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
‘महाबीज’च्या बीजोत्पादकांना मिळणार एकच...अकोला ः राज्यातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे...
नगरला वांगी, फ्लॉवरच्या दरात सुधारणा...नगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
चोपडा साखर कारखाना कर्मचाऱ्यांचे धरणे...चोपडा, जि.जळगाव : चोपडा साखर कारखान्याचे काही...
पुष्प संशोधन संचालनालयाचे कार्यालय,...पुणे ः भारतीय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या...
हुलगे हुलगे-पावन पुलगे..! वेळा...नांदेड : सोलापूर, मराठवाडा, कर्नाटकच्या सीमेवरील...
पशुरोगांच्या निदान, उपचारात नव...अकोला ः कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या पार्श्‍...
कापडावर वाढीव जिएसटीला तुर्तास स्थगिती...कापडावरचा जीएसटी (GST) वाढवण्याचा निर्णय...