सोयाबीन बियाणे उगवणीबाबत ९२५० शेतकऱ्यांकडून तक्रारी

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून सोयाबीन बियाण्याची उगवण कमी झाल्याबाबतच्या तक्रारींचा ओघ सुरूच आहे.
soybean
soybean

नांदेड: नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून सोयाबीन बियाण्याची उगवण कमी झाल्याबाबतच्या तक्रारींचा ओघ सुरूच आहे. शुक्रवारपर्यंत (ता. २६) या तीन जिल्ह्यांतील सुमारे ९ हजार २५० शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या. पथकांकडून आजवर ५० ते ७० टक्के शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त क्षेत्रांचे पंचनामे झाले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानग्रस्त क्षेत्राची माहिती उपलब्ध होईल, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बीजोत्पादक कंपन्यांनी उत्पादित केलेले सोयाबीनचे बियाणे विकत घेऊन पेरणी केली. परंतु पेरणीनंतर सोयाबीन बियाण्याची उगवण कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून दुबार पेरणीची वेळ आली आहे. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता.२५) ५ लाख ११ हजार २१७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. मृग नक्षत्रात झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु, निकृष्ट दर्जामुळे बियाण्याची उगवण व्यवस्थित झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल करत मदतीची मागणी केली आहे. या तीन जिल्ह्यांतील ९ हजार २५० शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्याबाबत तक्रारी दाखल केल्या. तक्रारीनंतर कृषी विभागाच्या पथकामार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन सोयाबीन उगवणीची पाहणी केली जात आहे. अनेक ठिकाणी पेरणी केलेल्या बियाण्यावर बुरशीची वाढ झाल्यामुळे ते जमिनीत कुजून गेले आहे. काही ठिकाणी बियाण्याचे अंकुरण झाले. परंतु, जमिनीतून वर आले नसल्याचेदेखील आढळून आले आहे. नांदेड जिल्ह्यात ५५ टक्क्यांवर पंचनामे पूर्ण झाले आहेत. परभणी, हिंगोली जिल्ह्यात ७० टक्क्यांपर्यंत पंचनामे झाले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर एकूण नुकसानग्रस्त क्षेत्राची माहिती उपलब्ध होईल. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी अहवाल सादर केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com