Agriculture news in marathi 92.50 percent useful water in Siddheshwar dam | Agrowon

सिद्धेश्वर धरणामध्ये ९२.५० टक्के उपयुक्त पाणीसाठा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

गोजेगाव, जि. हिंगोली : पूर्णा नदीवरील औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणामध्ये गुरुवारी (ता. २१) सकाळी आठ वाजता ९२.५० टक्के (२.६४ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला होता. यंदा येलदरी पाठोपाठ सिद्धेश्वर धरणामध्ये देखील पुरेशा प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे रब्बी पिकांसाठी तसेच उन्हाळी हंगामातील सिंचन आवर्तनाची खात्री निर्माण झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

गोजेगाव, जि. हिंगोली : पूर्णा नदीवरील औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणामध्ये गुरुवारी (ता. २१) सकाळी आठ वाजता ९२.५० टक्के (२.६४ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला होता. यंदा येलदरी पाठोपाठ सिद्धेश्वर धरणामध्ये देखील पुरेशा प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे रब्बी पिकांसाठी तसेच उन्हाळी हंगामातील सिंचन आवर्तनाची खात्री निर्माण झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीच्या काही दिवसांमध्ये सिद्धेश्वर धरणामध्ये उणे पाणीसाठा होता. परंतु, त्यानंतर पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे खडकपूर्णा भरल्यामुळे नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे येलदरी धरण शंभर टक्के भरले आहे. येलदरी धरणातील वीजनिर्मिती केंद्रातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सिद्धेश्वर धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली.

गुरुवारी (ता. २१) सकाळी आठ वाजता सिद्धेश्वर धरणामध्ये २.६४ टीएमसी (९२.५० टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला होता. त्यामुळे यंदा रब्बी तसेच उन्हाळी हंगामातील सिंचनासाठी कालव्याव्दारे पाणी आवर्तनाची खात्री झाली आहे. अनेक गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यामुळे खरीप हंगामातील नुकसानीची कसर रब्बी आणि उन्हाळी हंगामात भरून काढता येईल, या आशेने लाभ क्षेत्रातील शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
मसाला, सुगंधी वनस्पतीवर्गीय पिकांची...अकोला  ः ‘‘आपल्याकडील हवामान, जमीन हे मसाला...
मराठवाड्यात यंदा तुती लागवडीसाठी...औरंगाबाद : मराठवाड्यात गतवर्षी दुष्काळाचा...
संपूर्ण कर्जमुक्तीसाठी भाजपचे आंदोलन अकोला  : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने...
`म्हैसाळ`च्या उन्हाळी आवर्तनाकडे...सलगरे, जि. सांगली : म्हैसाळ पाणी योजनेचे कालवे...
अकोला झेडपी देणार आत्महत्याग्रस्त...अकोला  ः नापिकी, कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात...
लातूर विभागात १४ लाख हेक्‍टरवर रब्बी...लातूर : विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत...
अमरावती जिल्ह्यात निवडणुकांचा बिगुलअमरावती  ः जिल्ह्यात एप्रिल ते जून या...
वऱ्हाडातील चार लाख शेतकरी...अकोला  ः राज्य शासनाने जाहीर केलेल्या...
मराठवाडा, खानदेशातील नऊ कारखान्यांची...औरंगाबाद  : येथील साखर सहसंचालक...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ३३११...नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जळगाव : कर्जमाफीसाठी ११३ शेतकऱ्यांचे...जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कराडी येथे रेंजअभावी कर्जमाफी लाभार्थी...पारोळा, जि. जळगाव ः राज्य सरकारच्या महात्मा...
पुष्पोत्सव अधिक मोठ्या स्वरूपात साजरा...नाशिक : ‘नाशिक महापालिका राबवत असलेला...
नाशिक जिल्ह्यात गव्हाच्या पेऱ्यात वाढनाशिक : जिल्ह्यात रब्बीच्या एकूण १ लाख १३ हजार...
किसान सभेतर्फे दिंडोरी तहसीलसमोर...नाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
बीटी कापूस बियाणे दर १० टक्‍के वाढवा:...नागपूर ः बियाणे उत्पादनासंबंधी विविध घटकांच्या...
कृषी परिषदेसमोर पदव्युत्तर...पुणे ः कृषी पदव्युत्तर पदवीला पूर्ववत व्यावसायिक...
गोंदियात अवकाळी पावसासह बरसल्या गारागोंदिया ः शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये...
जळगावात गवार १८०० ते ४२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.२५...
सातारा जिल्ह्यातील ६३ हजारांवर...सातारा  : महात्मा जोतिराव फुले शेतकरी...