सातारा जिल्ह्यात ९३ टक्के पीककर्ज वितरण 

सातारा ः कोरोनामुळे संथगतीने सुरू असलेली पीक कर्जाच्या गाडीने वेग घेतला असून जिल्ह्यात ९३ टक्के पीक कर्ज वितरण झाले आहे. या कर्ज वितरणात जिल्हा बॅंकेने आघाडी कायम असून आत्तापर्यंत उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजेच १३० टक्के पीक कर्ज वितरण केले आहे. राष्ट्रीयीकृत व खासगी बँकाने अपेक्षित वितरण झालेले नाही. राष्ट्रीयीकृत बँकानी ४५ तर खासगी बँकानी अवघे १९ टक्के कर्ज वितरण केले आहे.
93% crops loan disbursement in Satara district

जिल्ह्यात कोरोनामुळे जिल्हा बँकेचा अपवाद वगळता इतर बँकाचा कर्जपुरवठा करणाऱ्याकडे दुर्लक्ष केले जात होते. जून पासून या बँकांकडून कर्ज वितरणाकडे लक्ष दिले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. खरीप हंगामातील पीक कर्जासाठी १६०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी १४८३ कोटी ४१ लाख रुपये म्हणजेच ९३ टक्के पीक कर्ज वितरण झाले आहे. 

या वितरणात जिल्हा बँकेचा सर्वात मोठा वाटा आहे. जिल्हा बँकेस ९५० कोटी उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे १२३१ कोटी ३१ लाख रुपयांचे वितरण केले आहे. या बँकेने १३० टक्के पीक वितरण करत आघाडी कायम ठेवली आहे. राष्ट्रीयीकृत बँकाकडून कर्ज वितरणात काहीशी सुधारणा केली आहे. मात्र, खासगी बँकाकडून दुर्लक्ष सुरूच आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना ४९० कोटींचे उद्दिष्टे देण्यात आले होते. यापैकी या बँकांनी २२१ कोटी ३० लाख रूपये म्हणजेत ४५ टक्के वितरण केले आहे. तसेच खासगी बँकांना १५८ कोटी ८० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी २९ कोटी ६५ लाख रुपयांचे म्हणजेच १९ टक्के कर्ज वितरण झाले आहे. 

खरिपात सप्टेंबर अखेर कर्ज वितरण केले जाते. यामुळे पुढील तीन महिन्यांत राष्ट्रीयीकृत, खासगी बॅंका किती कर्ज वितरण करतात हे पाहणे औत्सुकाचे ठरणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com