सांगली जिल्ह्यात ९३८ कोटींची ऊसबिले थकीत

938 crores of sugarcane bill is pending in Sangli district
938 crores of sugarcane bill is pending in Sangli district

सांगली ः जिल्ह्यातील बहुसंख्य साखर कारखान्यांमध्ये आता गळीत हंगाम धूमधडाक्यात सुरू आहे. आजअखेर जिल्ह्यात जवळपास ३३ लाख ४५ हजार टन उसाचे गाळप झाले. मात्र, एखादा अपवाद वगळता सर्वच कारखान्यांकडे ऊस उत्पादकांची तब्बल ९३८ कोटींहून अधिक रकमेची ऊसबिले अर्थात ‘एफआरपी’ची रक्कम थकीत राहिली आहे. शेतकऱ्यांनी थकीत बिले देण्यासाठी साखर कारखान्यांकडून कोणतीही ठोस भूमिका नसल्याचे चित्र नाही. त्यामुळे ऊसबिले कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

जिल्ह्यातील सुमारे १२ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. गाळप हंगाम सुरू होऊन आता पावणे दोन महिन्याचा कालावधी झाला आहे. आजअखेर ३३ लाख ४५ हजार मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे. ;

कारखान्यांनी गाळपाची स्पर्धा सुरू केली आहे. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे या वेळी महापूर, परतीचा पाऊस यामुळे उसाची समाधानकारक वाढ झालेली नाही. यामुळे कारखान्यांना आता काही प्रमाणात उसाच्या टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे गतवर्षीपेक्षा चालुवर्षी हंगाम लवकर आटोपणार असल्याचे चित्र आहे.

एफआरपीचे तुकडे पाडता येणार नाही  गेली दोन वर्षे केंद्र सरकाने साखरेचे किमान मूल्य ३१०० रुपये ठरवून दिले आहे. बफर स्टॉकवरील कर्जाचे व्याज देखील सरकार भरणार आहे. उत्पादनाच्या १६ टक्के साखर निर्यात करायची आहे. यासाठी अनुदान आहे. बंदरापर्यंतच्या वाहतुकीला अनुदान आहे. साखरेचा रिलिज कोठा ठरवून दिला आहे. त्यामुळे उर्वरित साखर गोदामात राहणार आहे, त्याचे भाडे देखील सरकार देणार आहे. अशा विविध पद्धतीने सरकार कारखानदार मदत करीत आहेत. त्यामुळे एफआरपीमध्ये तुकडे पाडता येणार नाहीत.

एफआरपी एकर रकमी दिली पाहिजे. १४ दिवसांत बंधन असले तरी एका महिन्यात द्यायला हवा. एफआरपीचे तुकडे करता येणार नाहीत. तुकडे पाडले तर शेतकरी संघटना आंदोलनही करेल आणि सरकारकडे दाद मागेल.  - संजय कोले, राज्यप्रमुख, सहकारी आघाडी शेतकरी संघटना शरद जोशीप्रणीत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com