‘ॲग्रोवन’ जलसमृद्धी योजनेत साडेनऊ लाखांची बक्षिसे

‘ॲग्रोवन’ जलसमृद्धी योजनेत साडेनऊ लाखांची बक्षिसे
‘ॲग्रोवन’ जलसमृद्धी योजनेत साडेनऊ लाखांची बक्षिसे

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी ‘ॲग्रोवन’कडून यंदा ‘जलव्यवस्थापन वर्ष’ साजरे केले जात आहे. त्यातील विविधांगी उपक्रमांचा एक भाग म्हणून ‘ॲग्रोवन’च्या वाचकांसाठी तब्बल साडेनऊ लाख रुपयांच्या विविध बक्षिसांची योजना येत्या तीन मेपासून सुरू होत आहे.  एकूण ९.५१ लाख रुपयांची तब्बल ११११ बक्षिसे जिंकण्याची संधी असलेल्या या योजनेचे प्रायोजक ड्रीप इंडिया इरिगेशन प्रायव्हेट लिमिटेड व अजय बायोटेक इंडिया लिमिटेड हे आहेत. कमी पाण्यात चांगली शेती बहरण्यासाठी चालू वर्षात जलव्यवस्थापनाचे संपूर्ण मार्गदर्शन ‘ॲग्रोवन’कडून दिले जात आहे. त्याचबरोबर वाचकांसाठी तीन मेपासून ३१ जुलैपर्यंत बक्षीस योजनेचा नवा नजराणादेखील दिला जातो आहे. यात पहिले बक्षीस म्हणून ८० हजार रुपये किमतीची ड्रीप आॅटोमेशन यंत्रणा दिली जाईल. जलव्यवस्थापनाबाबतची उपयुक्त माहिती या काळात कूपनसमवेत प्रसिद्ध केली जाणार आहे. जलवंत वाचकांना भाग्यवंत होण्यासाठी रोजचा ‘ॲग्रोवन’ वाचून त्यातून प्रसिद्ध होणाऱ्या ९० कूपन्सवर लक्ष ठेवावे लागेल. त्यातील किमान ७० कूपन्स व या योजनेतील सहभागाची प्रवेशिका ‘ॲग्रोवन’कडे पाठवावी लागेल. या योजनेतील दुसरे बक्षीस ४० हजार रुपये किमतीच्या एक एकर ड्रीप यंत्रणेचे असेल. तिसरे बक्षीस म्हणून ३० हजाराचा स्प्रिंकलर सेट दिला जाईल. २५ भाग्यवंत वाचकांना चौथे बक्षीस म्हणून ३५०० रुपये किमतीचे ड्रीप टेप दिले जातील. ७० वाचकांना पाचव्या बक्षिसापोटी ३०५० रुपये किमतीचा स्क्रिन फिल्टर दिला जाईल. सहाव्या बक्षिसापोटी ६०० रुपये किमतीचे अजय बायोटेक इंडिया लिमिटेड प्लान्ट न्युट्रिशन कीट ५०० दिले जाणार आहे. याशिवाय ५१० वाचकांना उत्तेजनार्थ बक्षिसे मिळणार आहेत. बक्षीस योजनेत सहभागी होण्यासाठी नजीकच्या वृत्तपत्र विक्रेत्याकडे आजच संपर्क साधून आपला ‘ॲग्रोवन’चा अंक राखून ठेवावा.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com