agriculture news in Marathi, 95 percent rain in august and suptember, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

अॉगस्ट, सप्टेंबरमध्ये पडणार ९५ टक्के पाऊस
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

पुणे : मॉन्सून हंगामाच्या दुसऱ्या टप्प्‍यात (ऑगस्ट ते सप्टेंबर) देशात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने (आयएमडी) जाहीर केला आहे. या अंदाजात ८ टक्के कमी अधिक तफावत राहण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात देशात ९६ टक्के म्हणजेच सर्वसाधारण पाऊस पडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

पुणे : मॉन्सून हंगामाच्या दुसऱ्या टप्प्‍यात (ऑगस्ट ते सप्टेंबर) देशात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने (आयएमडी) जाहीर केला आहे. या अंदाजात ८ टक्के कमी अधिक तफावत राहण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात देशात ९६ टक्के म्हणजेच सर्वसाधारण पाऊस पडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

जून महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी म्हणजेच ९४ पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, शुक्रवारी (ता. ३) जाहीर करण्यात आलेल्या सुधारित अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात देशात सरासरीइतका म्हणजेच ९६ टक्के पाऊस पडण्याची व त्यात ९ टक्के कमी अधिक तफावत असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ९६ ते १०४ टक्के पाऊस सरासरी इतका मानला जातो. आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी (९४ टक्क्यांपेक्षा कमी) पाऊस पडण्याची शक्यता ४७ टक्के, तर सरासरी इतका (९४ ते १०६ टक्के) पावसाची शक्यता ४१ टक्के आणि सरासरीपेक्षा अधिक (१०६ टक्क्यांपेक्षा अधिक) पाऊस पडण्याची शक्यता १२ टक्के असल्याचेही हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

जुलैअखेर देशात चांगला पाऊस 
मॉन्सून हंगामाच्या पहिल्या टप्प्यात बिहार, झारखंड आणि ईशान्य भारतातील राज्य वगळता उर्वरित देशात सर्वदूर चांगला पाऊस पडल्याचे सांगण्यात आले. उर्वरित दोन महिन्यांतही पावसाच्या वितरणाची हीच स्थिती कायम राहणार असून, शेतीसाठी २०१८ चा मॉन्सून कृषी क्षेत्राला लाभदायक ठरणार असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. ३१ जुलैपर्यंत ईशान्य भारतातील मणिपूरमध्ये सर्वांत कमी म्हणजेच सरासरीच्या अवघा ३६ टक्के पाऊस पडला आहे. मेघालयमध्ये सरासरीच्या ५७ टक्के, अरुणाचल प्रदेशात ६३ टक्के, आसाममध्ये ७३ टक्के, नागलॅंडमध्ये ८० टक्के पाऊस झाला अाहे. तर पूर्व भारतातील बिहार राज्यात सरासरीच्या ७७ टक्के आणि झारखंडमध्ये ७६ टक्के पावसाची नोंद झाली. लक्षद्वीप बेटांवरही ५७ टक्के पाऊस पडला आहे. 

महाराष्ट्रात सर्वसाधारण हजेरी 
महाराष्ट्रात जुलै अखेरपर्यंतची सरासरी ५४३.८ आहे. त्या तुलनेत ६१३.८ मिलिमीटर म्हणजेच सरासरीपेक्षा १३ टक्के अधिक पाऊस पडला आहे. सरासरीच्या उणे किंवा अधिक १९ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो. विभागनिहाय पावसाचा विचार करता सर्वाच विभागात सर्वसाधारण पाऊस असून, मराठवाड्यात इतर विभागापेक्षा कमी (९१ टक्के) पाऊस पडला आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या १११ टक्के, तर कोकणात १२३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. 

राज्यात जुलैअखेर पडलेला पाऊस

विभाग सरासरी पडलेला टक्केवारी
काेकण १८०९.१ २२१९.७ १२३
मध्य महाराष्ट्र ३८७.८ ४२८.९ १११
मराठवाडा ३३०.५ ३०१.१ ९१
विदर्भ ४७९.९ ५३३.४ १११

 

इतर अॅग्रो विशेष
नागपूरच्या बाजारात भाव खाणारी सावळीची...बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सातत्याने विविध...
संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीच्या हालचालीपुणे : बाजार समित्यांच्या जोखडातून शेतीमालाची...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे: अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे आणि परिसरावर...
‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे थाटात...सोलापूर : ‘सकाळ ॲग्रोवन’च्या यंदाच्या दिवाळी...
२०१९ पशूगणना : गायींची संख्या १८...पुणे ः देशात २०१२ मध्ये ५१२ दशलक्ष पशुधन होते....
कर्जमाफीच्या गोंधळामुळे सोसायट्या संकटातसांगली ः कर्जमाफीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही....
मुद्रांक शुल्कात आठशे कोटींनी घटसोलापूर : मुद्रांक शुल्कातून २७ हजार कोटींच्या...
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
शेततळ्यातील पाण्यावर फुलले शेडनेटमधील...पावसाचे कायम दुर्भिक्ष, त्यामुळे शेती अर्थकारणाला...
राज्यात गाजर ११०० ते ८००० रुपये...जळगावात ११०० ते १८०० रुपये दर जळगाव कृषी...
ऋतुचक्र बदलया वर्षीचा मॉन्सून अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण...
प्रतिष्ठेचं वलय होतंय द्राक्ष...द्राक्ष शेतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...