अकोल्यातून ९७२ जणांना मिळाली ई-परवानगी 

अकोला ः लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांना आपल्या घराची ओढ लागली आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यात अडकलेल्यांनी आपापल्या जिल्ह्यात जाण्यासाठी आॅनलाइन १२८३ अर्ज केले आहेत. त्यापैकी ९७२ जणांना आॅनलाईन पद्धतीने ई-परवानगी देण्यात आली आहे.
972 people got e-permission from Akola
972 people got e-permission from Akola

अकोला ः लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांना आपल्या घराची ओढ लागली आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यात अडकलेल्यांनी आपापल्या जिल्ह्यात जाण्यासाठी आॅनलाइन १२८३ अर्ज केले आहेत. त्यापैकी ९७२ जणांना आॅनलाईन पद्धतीने ई-परवानगी देण्यात आली आहे. 

अकोला जिल्ह्यात अडकून पडलेल्यांना बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी ई- पास मागणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जात आहेत. जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर माहिती भरावी लागते. गेल्या दोन दिवसांत सुमारे १२८३ जणांनी अर्ज केले. त्यापैकी ९७२ जणांना ई- परवानगी मिळाली आहे. 

या संदर्भात जिल्हा प्रशासनातर्फे उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार हे समन्वय अधिकारी म्हणून तर परराज्यात जाण्यासाठी उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे हे समन्वय अधिकारी म्हणून काम करीत आहेत. प्राप्त ऑनलाइन अर्ज प्रणालीवरून ९७२ ई-परवानग्या देण्यात आल्याने या नागरिकांचा घराकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला. 

येथे करा अर्ज  अकोला जिल्ह्यातून महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात वा देशातील अन्य राज्यातील जिल्ह्यात जाण्यासाठी मजूर, कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींनी https://covid१९.mhpolice.in/ या लिंक वर माहिती भरावी. तसेच (Upload Your Aadhar Card and Medical Certificate in Single file) या ठिकाणी वैद्यकीय तपासणी अहवाल लावणे अनिवार्य आहे. ही माहिती भरल्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयास संपर्क साधण्यात येतो. संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाते. अधिक माहितीसाठी ०७२४-२४२४४४४ या क्रमांकावर संपर्क साधण्याची सोय आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com