agriculture news in Marathi 99 percent FRP paid by factories Maharashtra | Agrowon

राज्यातील साखर कारखान्यांकडून एफआरपीचे ९९ टक्के वाटप

टीम अॅग्रोवन
रविवार, 9 ऑगस्ट 2020

राज्यातील साखर कारखान्यांनी लॉकडाउन आणि घसरलेल्या साखरदराच्या समस्येला तोंड देत आत्तापर्यंत ९९ टक्के एफआरपी अदा केली आहे. १४४ साखर कारखान्यांनी यंदा ५५०.१७ लाख टन ऊस गाळप केले.

पुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी लॉकडाउन आणि घसरलेल्या साखरदराच्या समस्येला तोंड देत आत्तापर्यंत ९९ टक्के एफआरपी अदा केली आहे. १४४ साखर कारखान्यांनी यंदा ५५०.१७ लाख टन ऊस गाळप केले. कायद्यानुसार शेतकऱ्यांना १३ हजार ८९१ कोटी रुपये देण्याची आवश्यकता होती. कारखान्यांनी उत्तम नियोजन करीत आत्तापर्यंत १३ हजार ७५९ कोटी रुपये अदा केले आहेत. 

चालू हंगामातील थकीत एफआरपीची रक्कम आता अवघी १३२ कोटीची असून ती एकूण एफआरपीच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. मात्र, मागील हंगामातील ३८९ कोटी रुपये अजूनही शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाहीत. कराराप्रमाणे चालू हंगामाचे अजून ५०० कोटी रुपये द्यायचे आहेत. मात्र, करार असल्यामुळे ती रक्कम थकीत एफआरपी म्हणून गणली जात नाही. 

‘‘२०१८-१९ च्या हंगामात राज्यात ९५२ लाख टन ऊस गाळला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना २२ हजार ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त पेमेंट वाटले गेले होते. २०१९-२० च्या हंगामात ऊस उत्पादन ४०२ लाख टनाने घटले. उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना यंदा ८ हजार ९४० कोटी रुपये कमी मिळाले आहेत,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

राज्यात यंदा १०० टक्के एफआरपी वाटणाऱ्या कारखान्यांची संख्या १२० झाली आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत थकीत एफआरपीची रक्कम ६५५ कोटीची होती. मात्र, शेतकऱ्यांना वाटली गेलेली रक्कम २२ हजार कोटीची होती. ‘‘लॉकडाउन असतानाही कारखान्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. शेतकऱ्यांशी करार करीत आर्थिक नियोजनाची काळजी देखील कारखान्यांनी घेतली. त्यामुळे यंदा राज्यातील कोणत्याही कारखान्याला आरआरसी (महसूल वसुली प्रमाणपत्र) कारवाईला सामोरे जावे लागले नाही,’’ असे साखर कारखाना उद्योगातून सांगण्यात आले.

प्रतिक्रिया
राज्यातील साखर कारखान्यांची यंदा एफआरपी बाकी आता एक टक्का इतकीच दिसते आहे. मात्र, कराराप्रमाणे ५०० कोटी रुपये द्यायचे आहेत. शेतकऱ्यांनी यंदा कारखान्यांशी मोठ्या प्रमाणात करार केले आहेत. या करारानुसार ही बाकी आता कमी दिसते आहे.
- शेखर गायकवाड, साखर आयुक्त


इतर अॅग्रो विशेष
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
हलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...
कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...
नाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...
कुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...
काजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...
सोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...
झेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...