Agriculture news in marathi, Aadhaar authentication of 3995 account holders pending in Jalna | Page 2 ||| Agrowon

जालन्यात ३९९५ खातेदारांचे आधार प्रमाणीकरण बाकी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 ऑक्टोबर 2021

जालना : जिल्ह्यात कर्जमाफी योजनेअंतर्गत एकूण १ लाख ७१ हजार ६२५ इतक्या पात्र कर्जखात्यांच्या याद्या विशिष्ट क्रमांकासह प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी एकूण १ लाख ६७ हजार ६२९ खातेदारांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. जवळपास ३९९५ खातेदारांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे.

जालना : जिल्ह्यात कर्जमाफी योजनेअंतर्गत एकूण १ लाख ७१ हजार ६२५ इतक्या पात्र कर्जखात्यांच्या याद्या विशिष्ट क्रमांकासह प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी एकूण १ लाख ६७ हजार ६२९ खातेदारांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. जवळपास ३९९५ खातेदारांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे.

शासन निर्णय २७ डिसेंबर २०१९ नुसार  ०१.०४.२०१५ ते ३१.०३.२०२१ या कालावधीमध्ये पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू करण्यात आली. जालना जिल्ह्यात योजनेतील ३९९५ पात्र कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त असतानाही संबंधित लाभार्थ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही. त्यामुळे त्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्या अनुषंगाने आधार प्रमाणीकरण व तक्रार निराकरण विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

१५ ऑक्टोबर २०२१ ते १५ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. 

आधार प्रमाणीकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बँक शाखा, संस्था कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येतील. या विशेष मोहिमेअंतर्गत आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. ही अंतिम संधी आहे. या कालावधीत आधार प्रमाणीकरण न केल्यास कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. यासाठी सर्व संबंधित लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. त्यासाठी तालुका सहायक निबंधक, सहकारी संस्था व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालय व बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक  बाळासाहेब चव्हाण यांनी केले.


इतर बातम्या
नवीन ११४० कृषिपंपांना जोडण्या ः पडळकरनांदेड : ‘‘राज्य शासनाने सुरू केलेल्या कृषिपंप...
नाशिक: किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत...नाशिक: खरीप पणन हंगाम २०२१-२२ मध्ये केंद्र...
सांगली जिल्ह्यात बाधित पिकांचे पंचनामे...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी...
जळगाव : नावासह पत्ता दुरुस्तीसाठी  ६५...जळगाव : जिल्ह्यात मतदार यादी विशेष संक्षिप्त...
खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडत जळगाव ः खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडतच सुरू...
नाशिक : दुधाळ जनावरांच्या गटवाटप ...नाशिक : पशुसंवर्धन विभागामार्फत नावीन्यपूर्ण...
सोलापूर :सिद्धेश्‍वर कारखान्याला...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी...
राज्यामध्ये थंडीत वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे...
मराठवाड्यात रब्‍बीत कपाशीची लागवडऔरंगाबाद : मराठवाडा म्हणजे कपाशीचा पट्टा. या...
मर रोगामुळे तुरीचे उभे पीक वाळू लागलेनांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून...
बळिराजासाठी पोलिस आले धावूनसिरोंचा, गडचिरोली : शेतात पांढरे सोने, अर्थात...
आंदोलनातील शहिदांना आर्थिक भरपाई द्यावी...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी...
आरक्षण नाही, तर मतदान नाही; ओबीसींचा...भंडारा : २७ टक्के ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने...
सोयाबीन बाजारात हेलकावेपुणे ः पंधरा दिवसांपासून सोयाबीन बाजारात चढ-उतार...
नांदेड जिल्ह्यात फळपीक विमा मंजुरीची...नांदेड : मागील वर्षी मृग तसेच आंबिया बहरासाठी...
औरंगाबाद : जमिनीवरील अत्याचार थांबवू;...औरंगाबाद : आम्ही आमच्या गावातील जमिनीवर होणारे...
प्रोग्रेसिव्ह पॅनेलला  काठावरचे बहुमत पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार व्यापाऱ्यांची...
उत्पादन खर्च वाढल्याने येवल्याची पैठणी...येवला, जि. नाशिक : राजवस्त्र, अर्थात येवल्याची...
रेशीम कोषाला सोनेरी दिवसपुणे : चालू वर्षी रेशीम कोषाला सोन्याचे दिवस आले...
पुणे :एकवीस जागांसाठी २९९ अर्जपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...