परभणी जिल्ह्यात साडेआठ हजार लाभार्थ्यांचे अाधार प्रामाणिकरण अपूर्ण

परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गंत पात्र परंतु आधार प्रमाणिकरण अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ८ हजार ४५७ शेतकरी लाभार्थ्यांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही.
Aadhaar authentication of eight and a half thousand beneficiaries in Parbhani district is incomplete
Aadhaar authentication of eight and a half thousand beneficiaries in Parbhani district is incomplete

परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गंत पात्र परंतु आधार प्रमाणिकरण अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ८ हजार ४५७ शेतकरी लाभार्थ्यांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही. संबंधित शेतकऱ्यांनी सोमवार (ता.२१) पर्यंत आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. तक्रार नोंदविलेल्या शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मंगेश सुरुवसे यांनी केले.

कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या एकूण ६ याद्या प्रसिध्द झाल्या आहेत. त्या बँकांच्या शाखा,सी.एस.सी., आपले सरकार सेवा केंद्र, यासारख्या जनसुविधा केंद्र, तालुक्याच्या ठिकाणचे सहाय्यक निबंधक (सहकरी संस्था) यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांना बघण्यास उपलब्ध आहेत. बुधवार (ता.९) अखेर १ लाख ७६ हजार ७८ लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे. त्यापैकी १ लाख ५७ हजार ८९ लाभार्थ्यांच्या खात्यात १ हजार २४ कोटी ८२ लाख रुपये रक्कम जमा करण्यात आली. 

अद्याप विविध बॅकांच्या मिळून एकूण ८ हजार ४५७ शेतकरी कर्जदार लाभार्थ्यांनी आधार प्रमाणिकरण केलेले नाही. त्यात प्रामुख्यांने भारतीय स्टेट बॅंक, जिल्ह मध्यवर्ती सहकारी बॅंक, महाराष्ट्र ग्रामीण बॅंक, बॅंक ऑफ महाराष्ट्र या बॅंकांच्या कर्जदार शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. पात्र लाभार्थ्यांनी सोमवार (ता.२१) पर्यंत आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. संबंधित बॅकांमार्फत कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करणे शक्य होईल. लाभार्थी शेतकरी सन २०२०-२१ या हंगामामध्ये पीककर्ज घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत.आधार प्रमाणीकरण न केल्यास लाभ मिळणार नाही. ही रक्कम बँका व्याजासहित संबंधिताकडून वसुल करतील. 

तक्रार निकाली निघाल्या शिवाय कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नाही. मयत खातेदारांच्या नातेवाईक अथवा कायदेशिर वारसाने आधार प्रमाणीकरण न करता प्रथम कायदेशीर वारसाने त्याची संपूर्ण माहिती तत्काळ संबंधित बॅंक शाखेस पुरविल्यास वारसाची नोंद कर्ज खात्यास करुन घ्यावी. या योजनेमध्ये एन.पी.ए.झालेल्या खात्यावर शासनाकडून कर्जमुक्तीची पूर्ण रक्कम येणार नाही.

उर्वरित रक्कम संबंधित बॅंकांनी सोसायची आहे. शेतकऱ्यांकडून कसलीही रक्कम बँकांनी भरुन घ्यावयाची नाही. पुनर्गठण आणि फेरपुनर्गठण असलेल्या कर्जाची संपूर्ण रक्कम माफ होणार नाही. सप्टेंबर २०१९ वरील थकीत हप्त्याची रक्कम माफ होणार आहे. कर्जमुक्तीच्या यादीत नाव येईल, त्यावेळी आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे, असे सुरवसे यांनी सांगितले.

आधार प्रमाणिकरण स्थिती

प्रमुख बॅका  शेतकरी संख्या
भारतीय स्टेट बॅंक  ३८७४
जिल्हा म.स. बॅंक २४७४
महाराष्ट्र ग्रामीण बॅंक ५९२
बॅंक ऑफ महाराष्ट्र ४४२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com