Agriculture news in marathi, Aadhaar authentication of two lakh 38 thousand account holders: Dabshede | Page 3 ||| Agrowon

दोन लाख ३८ हजार खातेदारांचे आधार प्रमाणीकरण ः दाबशेडे

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 ऑक्टोबर 2021

औरंगाबाद : जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत २ लाख ४२ हजार ८४३ पात्र कर्जखात्यांच्या याद्या विशिष्ट क्रमांकासह प्राप्त झाल्या. त्यापैकी २ लाख ३८ हजार ८८ खातेदारांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. 

औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत २ लाख ४२ हजार ८४३  पात्र कर्जखात्यांच्या याद्या विशिष्ट क्रमांकासह प्राप्त झाल्या. त्यापैकी २ लाख ३८ हजार ८८ खातेदारांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. तर ४ हजार ७५५ खातेदारांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे. आधार प्रमाणीकरण तसेच जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय तक्रारींच्या निराकरणासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम घेण्यात आली’’, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी दिली.

शासन निर्णयानुसार १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीमध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ ही योजना सुरू करण्यात आली. ४७५५ पात्र कर्जखातेदारांनी विशिष्ट क्रमांक प्राप्त असतानाही अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही. त्यामुळे त्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेला नाही. योजना अंमलबजावणीमधील आधार प्रमाणीकरण व तक्रार निराकरण या टप्प्यावरील प्रलंबित कामकाज विशेष मोहिमेद्वारे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

१५ ऑक्टोबर २०२१ ते १५ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत आधार प्रमाणीकरणासह जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय तक्रारींच्या निराकरणासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तरी बाकी शेतकऱ्यांच्या याद्या बँक शाखा, संस्था कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येतील. या विशेष मोहिमेअंतर्गत आधार प्रमाणीकरण करण्यासाठी ही अंतिम संधी आहे. अन्यथा, कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळू शकणार नाही.

सर्व संबंधित लाभार्थ्यांनी तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थांचे कार्यालय, बँक ऑफ महाराष्ट्र जिल्हा क्षेत्रीय कार्यालय औरंगाबाद, मुख्य कार्यकारी अधिकारी औरंगाबाद जिल्हा बँक, औरंगाबाद तसेच आपल्या बँक शाखेशी संपर्क साधावा, अशी सूचना दाबशेडे यांनी केली.


इतर बातम्या
मेंढ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच योजना ...सुपे, जि. पुणे ः पावसाची संततधार, अतिवृष्टी व...
शेतकऱ्यांनी करून दाखवलं : डॉ. गौहर रझा नाशिक : नव्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शेतकरी...
द्राक्ष पीकविमा योजना  विभागनिहाय...नाशिक : दोन दिवसांपासून राज्यात झालेल्या...
सोयाबीन दरातील सुधारणा  आठवड्याच्या...पुणे ः चालू आठवड्यात बुधवारनंतर सोयाबीन दरात...
‘जवाद’ चक्रीवादळाची  तीव्रता कमी होणारपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ...
दर्जेदार कृषी विद्यापीठांत  राज्याला...पुणे ः देशातील पहिल्या २० दर्जेदार कृषी...
पुणे जिल्ह्यात १,२४५ ‘विकेल ते पिकेल’...पुणे : शेतीमालाला केवळ हमीभाव नाही तर हमखास भाव...
पुणे जिल्ह्यात धरणांत एक टीएमसी...पुणे : जिल्ह्यात दोन दिवसांपासून धुमाकूळ...
कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी ३६८...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या...
सांगली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांचे...सांगली : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार...
सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदाची...सांगली ः जिल्हा बँकेत अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव...
नंदुरबार : पशुसंवर्धन विभागाच्या...नंदुरबार : पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२१-२२ या...
नंदुरबार : रब्बीचे अनुदानित बियाणे...नंदुरबार : कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात मका लागवड घटणार  गहू, बाजरीची...जळगाव ः खानदेशात मका लागवड घटेल, असे संकेत आहेत....
नांदेड जिल्ह्यात नुकसानीच्या मदतीचे...नांदेड : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी...
नगर जिल्ह्यात रब्बी पेरणी पोहोचली ३१...नगर ः रब्बी हंगामातील बहुतांश पिकांच्या पेरणीचा...
सातारा जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसाचा...सातारा ः जिल्ह्यात शुक्रवारी (ता.३) पावसाचा जोर...
रब्बी, उन्हाळी हंगामांत पिकांखालील...वर्धा : या वर्षी पाऊस लांबल्याने प्रकल्पांमध्ये...
सोलापूर :शेतकऱ्यांना दुधाळ गाई,...सोलापूर : पशुसंवर्धन विभागामार्फत दुधाळ गाई-...
वीज प्रश्‍नांवर सकारात्मक तोडगा काढणार...वाशीम : जिल्ह्यात विजेची समस्या दिवसेंदिवस गंभीर...