शेतकऱ्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी जोडावे 

The Aadhaar card of the farmers should be linked to the bank account
The Aadhaar card of the farmers should be linked to the bank account

वाशीम : जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी एक एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतले आहे आणि हे कर्ज ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत आहे, त्या कर्जाची अद्यापपर्यंत संबंधित शेतकऱ्यांनी परतफेड केली नाही, अशा थकबाकीदार शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यासाठी बँकांनी संबंधित शेतकऱ्यांचे आधारकार्ड क्रमांक बँक खात्याशी तातडीने संलग्नित करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अनुषंगाने आयोजित आढावा सभेत श्री. मोडक बोलत होते. सभेला निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक विजय खंडरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

श्री. मोडक म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत बँकांनी मिशन मोडवर काम करून सात जानेवारी २०२० पर्यंत थकीत कर्जदार शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधारकार्ड क्रमांकाशी संलग्नित करावे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ वेळीच मिळण्यास मदत होईल. 

श्री. मोडक म्हणाले, ज्या शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेकडून कर्ज घेतले आहे त्यांनी संबंधित सेवा सहकारी संस्था, तालुका देखरेख संघ कार्यालय, सहायक निबंधक यांच्या कार्यालयात जाऊन आधारकार्ड, पासबुकच्या आतील पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत व भ्रमणध्वनी क्रमांक द्यावा म्हणजे तातडीने या योजनेचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना देणे सोयीचे होईल.

बँकांनी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी ः कटके जिल्हा उपनिबंधक श्री. कटके म्हणाले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यासाठी बँकांनी आपल्या नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. नोडल अधिकाऱ्याने करण्यात येत असलेल्या कामाची माहिती जिल्हाधिकारी, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला वेळोवेळी उपलब्ध करून द्यावी. २८ कॉलममध्ये संबंधित शेतकऱ्यांची माहिती बँकांनी ता. सात पर्यंत भरून द्यावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com