Aadhaar certification balance of sixteen thousand farmers
Aadhaar certification balance of sixteen thousand farmers

परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण शिल्लक

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी शुक्रवार (ता. ७) पूर्वी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे. तसेच मृत खातेदारांच्या नातेवाइकांनी संबंधित बँकेत वारस लावण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मंगेश सुरवसे यांनी केले आहे.

परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी शुक्रवार (ता. ७) पूर्वी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे. तसेच मृत खातेदारांच्या नातेवाइकांनी संबंधित बँकेत वारस लावण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मंगेश सुरवसे यांनी केले आहे.

कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आजपर्यंत बँकांमार्फत या योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या २ लाख ४३२ शेतकऱ्यांपैकी १ लाख ८२ हजार ६३३ लाभार्थ्यांच्या एकूण पाच याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. शुक्रवार (ता. ३१) अखेर एकूण १ लाख ६६ हजार २९४ लाभार्थींनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. त्यापैकी १ लाख ३६ हजार ३९६ लाभार्थ्यांच्या खात्यात ८७९ कोटी ३१ लाख रुपये जमा करण्यात आलेले आहेत. परंतु कर्जमुक्ती योजनेस पात्र ठरुनही, आधार प्रमाणीकरण नसल्याने जिल्ह्यातील १६ हजार ३३९ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही.

पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी विनाविलंब आपले सरकार केंद्र, जनसुविधा केंद्र (सीएससी) किंवा बॅंक शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना संबंधित बँकांमार्फत या योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करणे शक्य होईल. संपूर्ण कर्जमुक्त झालेले शेतकरी सन २०२०-२१ या हंगामामध्ये पीककर्ज घेण्यासाठीही पात्र ठरणार आहेत. त्यासाठी शुक्रवार (ता. ७) पूर्वी आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे.

पात्र लाभार्थ्यांच्या यादीतील आधार प्रमाणीकरण शक्य नाही (Unable to Authenticate) हा पर्याय निवडून तक्रार केलेल्या शेतकऱ्यांनी आधार कार्डाची स्व-साक्षांकित छायाप्रत तक्रार नांेदणीच्या पावती, बँकेचे पासबुकाचे पहिल्या पानाचे छायांकित प्रतीसह संबंधित तहसील कार्यालय अथवा साहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयास संपर्क साधून संबंधित तालुका स्तरीय समितीकडून आपले तक्रार निवारण करून घ्यावे. आधार क्रमांक अमान्य अशी तक्रार नोंदविलेल्या शेतकऱ्यांनी  आधारकार्डची स्व-साक्षांकित छायाप्रत तक्रार नोंदणीच्या पावती व बँकेचे पासबुकाचे पहिल्या पानाची छायांकित प्रतिसह संबंधित बॅंक शाखेत गटसचिव यांच्याकडे किंवा संबंधित सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात जमा करावी.

त्याचप्रमाणे कर्जमुक्तीच्या यादीतील मृत खातेदारांच्या नातेवाईक अथवा कायदेशीर वारसाने आधार प्रमाणीकरण न करता प्रथम कायदेशीर वारसाने त्याची संपूर्ण माहिती शुक्रवार (ता. ७) पर्यंत संबंधित बॅंक शाखेस सादर करावी. बँकेच्या नियमाप्रमाणे वारस लावण्याची प्रक्रिया पूर्ण करून त्याची नोंद कर्ज खात्यास करून घ्यावी. वारसाच्या नोंदीची माहिती बँका शुक्रवार (ता. ७) ते शुक्रवार (ता. १४) या कालावधीतच पोर्टलवर भरू शकणार असल्याने या बाबतीत मृत खातेदारांच्या वारसाने विहित मुदतीतच कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक आहे.

बँकांनी त्यांच्या स्तरावर देखील वारस लावून घेण्याच्या बाबतीत विहित मुदतीत दुरुस्त केलेली माहिती पोर्टलवर अपलोड करण्याच्या बाबतीत विहित मुदतीत कार्यवाही करणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांनी नवीन पीककर्ज घेण्यासाठी गावातील गट सचिव, संबंधित बॅंक शाखेशी आवश्यक त्या कागदपत्रासह संपर्क साधावा, असे आवाहन सुरवसे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांची बॅंकनिहाय संख्या
बॅंक शेतकरी संख्या
स्टेट बॅँक ऑफ इंडिया ८०१४
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ५७५३
महाराष्ट्र ग्रामीण बँक १०५३
बॅंक ऑफ बडोदा ६२०
बॅंक ऑफ महाराष्ट्र ६०९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com