हिंगोली जिल्ह्यात छत्तीस हजारांवर शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण

Aadhaar certification of farmers completed at thirty-six thousand Hingoli district
Aadhaar certification of farmers completed at thirty-six thousand Hingoli district

हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील विशिष्ट क्रमांक मिळालेल्या ७२ हजार शेतकऱ्यांपैकी ३६ हजार ११२ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. त्यापैकी ३३४ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांत ३ कोटी रकमेचे अनुदान वितरण करण्यात आले. 

लाभार्थी शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्ती प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा उपनिबंधक सुधीर मेत्रेवार, बँक ऑफ बडोदाचे बँक व्यवस्थापक सचिन शेगोकर, बँक ऑफ इंडिया हिंगोली शाखेचे आर. बी. कदम, बँक ऑफ इंडिया गंगानगर हिंगोली शाखेचे आशिष बडवणे, सहाय्यक निबंधक आत्माराम राठोड, सहकार अधिकारी ज्ञानेश्वर डुकरे, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जिल्हा नियंत्रण अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.

जिल्ह्यातील एकूण १ लाख ८ हजार शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र आहेत. त्यापैकी ९७ हजार ८६ शेतकऱ्यांची माहिती ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करण्यात आली. त्यापैकी विशिष्ट क्रमांक मिळालेली शेतकऱ्यांची संख्या ७२ हजार, तर आधार प्रमाणीकरण झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ३६ हजार ११२ आहे. आधार प्रमाणीकरण झालेल्यांपैकी ३३४ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांत ३ कोटी रकमेचे अनुदान वितरण करण्यात आले. जयवंशी म्हणाले, ‘‘आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ते करून घ्यावे.’’

लाभार्थी शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक सत्कार

साटंबा येथील लाभार्थी शेतकरी उध्दव घ्यार, येहळेगाव सोळंके येथील नितीन सोळंके, खानापूर चित्ता येथील रामदास जाधव, इसापूर येथील आत्माराम जगताप, भिंगी येथील ज्ञानेश्वर कऱ्हाळे यांच्यासह बँक ऑफ महाराष्ट्रातून कर्जमुक्ती झालेल्या ७ शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्ती प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com