नाशिकमधील आधार प्रमाणीकरण अंतिम टप्प्यात

नाशिक : राज्य शासनाने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण प्रक्रिया अनिवार्य आहे. त्यासाठी दुसऱ्या टप्प्याच्या कामकाजाची प्रक्रिया १७ जूनपासून सुरू झाली. जिल्ह्यात एकूण १ लाख २३ हजार ७०३ खाती पात्र आहेत. गुरुवार (ता. २)अखेर जिल्ह्यात १ लाख १५ हजार ५३७ खात्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.
Aadhaar certification in Nashik in final stage

लाभार्थींची गावनिहाय यादी प्रमाणीकरणासाठी उपलब्ध झाल्यानंतर लाभार्थी नावे करून देण्यात आली आहेत. त्यानुसार नाव आल्याप्रमाणे शेतकरी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण १ लाख ३१ हजार २३ खाती कर्जमाफी पोर्टलमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. त्यापैकी १ लाख २३ हजार ७०३ खाती पात्र ठरलेली आहेत. सध्या हे कामकाज अंतिम टप्प्यात आल्याची स्थिती आहे. मात्र, तांत्रिक अडचणी, काही खात्यांमधील त्रुटीमुळे काही खात्यांचे प्रमाणीकरण प्रलंबित आहे.

ज्यामध्ये जिल्हा सहकारी बँकेच्या लाभार्थ्यांच्या प्रमाणीकरणास गती दिसून आली. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांच्या कामकाजात मात्र संथपणा आहे. त्यातच काही खात्यांच्या त्रुटी असल्याने त्यांचे निरसन करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीकडे ६२८, तर तहसीलदार यांच्याकडे ७०५ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी अनुक्रमे ३२ व ३६५ तक्रारी निकाली निघाल्या आहेत. एकंदरीत, आता खरीप हंगामात पीककर्ज मिळण्यात अडचणी येत राहिल्या. त्यामुळे प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पीककर्ज वितरणाच्या कामकाजासाठी गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आधार प्रमाणीकरण स्थिती : (ता. २ अखेर)
बँक पात्र खाती प्रमाणीकरण झालेली खाती शिल्लक खाती
जिल्हा सहकारी बँक १,०३,३६२ १०१०५३ २३०९
राष्ट्रीयीकृत बँक २०,३४१ १४४८४ ५८५७
एकूण १,२३,७०३ १,१५,५३७ ८१६६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com