पुणे जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण

Aadhaar certification of one lakh farmers in Pune district
Aadhaar certification of one lakh farmers in Pune district

पुणे ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पुणे जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांची पहिली व दुसरी यादी जाहीर केली आहे.  दोन्ही टप्प्यांत निवडलेल्‍या गावांतील विशिष्‍ट क्रमांकासह एकूण कर्ज खाती एक लाख ५२ हजार १५७ एवढी आहे. त्यांपैकी एक लाख ४ हजार ३५८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण केले आहेत. तर २६ हजार ३१६ शेतकऱ्यांच्या खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्याचे शिल्लक असून ५२३ शेतकऱ्यांना ४ कोटी २९ लाख ५१ हजार रुपये वाटप केले, असल्‍याची माहिती जिल्‍हा उपनिबंधक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

सरकारने दुसऱ्या टप्प्यातील कर्जखात्यांची कर्जमाफी यादी गावनिहाय जाहीर केली आहे. एक एप्रिल २०१५ ते ३१ सप्टेंबर २०१९ पर्यंतच्या पीककर्ज थकीत शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यत कर्जमाफी जाहीर केली आहे. पुणे जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून खरिपासाठी आणि रब्बी पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची बॅंक कर्ज खाते थकीत होती. या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी पात्र धरण्यात आले होते. त्यासाठी संबंधित बॅंकेच्या माध्यमातून कर्ज खात्याला कर्जदार शेतकऱ्यांचे आधार कार्ड लिंक करण्यात आले होते. 

जिल्ह्यातील ८६३ शेतकऱ्यांचे आधारकार्ड लिंकिंग न होणे, नंबर चुकीचा असणे अशा तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींपैकी ५७४ तक्रारी तहसीलदार पातळीवर प्रलंबित आहे. तर २३५ तक्रारी जिल्हा पातळीवरील समितीकडे प्रलंबित आहे. तर तहसीलदार पातळीवरील ४२ तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून जिल्हा पातळीवरील १२ तक्रारींचे निराकरण करण्यात आलेले आहे. सध्या शनिवारी आणि रविवारी व इतर दिवशी शेतकरी आपले आधार प्रमाणीकरण करत आहे. त्यानंतर त्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया केली आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होईल त्यानुसार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात थकीत रक्कम जमा होणार आहे.

शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध पुणे जिल्ह्यात कर्जमाफीचा लाभास पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी गावामध्ये सोसायटी, ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. याबरोबरच बॅंकेच्या शाखेत गावनिहाय याद्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या यादीत आपल्या नावासमोर असणारा कोडनंबर घेऊन आधार कार्ड, बॅंक खाते पुस्तक आपल्या जवळच्या बॅंकेत अथवा महा ई- सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण केल्यानंतर आपल्या बॅंक खात्यात थकीत कर्ज रक्कम जमा होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com