नाशिक  : चांदोरी,सोंनाबे येथे कर्जमुक्ती प्रक्रियेस प्रारंभ

चांदोरी आणि सोंनाबे येथे आधार प्रमाणीकरणास सुरुवात
चांदोरी आणि सोंनाबे येथे आधार प्रमाणीकरणास सुरुवात

नाशिक  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्राथमिक प्रमाणीकरणाचा प्रारंभ आज निफाड तालुक्यातील चांदोरी व सिन्नर तालुक्यातील सोंनाबे येथील गावात करण्यात आला. या दोन्ही गावांतील ७७८ पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार शेतकऱ्यांना होणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी दिली. या कर्जमुक्ती योजनेंतर्गत निफाड तालुक्यातील चांदोरी व सिन्नर तालुक्यातील सोंनाबे येथील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेची सुरुवात सोमवारी (ता.२४) जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांच्या हस्ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या शुभारंभप्रसंगी सहायक निबंधक अभिजित देशपांडे, एस. पी. रुद्राक्ष, बी. डी. लिलके आदी उपस्थित होते. चांदोरी व सोंनाबे या दोन्ही गावांतील शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम सुरू करण्यात आले. आधार प्रमाणीकरण नोंदणीचे काम आपले सरकार केंद्रावर व संबंधित बँक शाखेत करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांचे आज आधार प्रमाणिकरण केले त्या शेतकऱ्यांना पुरावा म्हणून छापील पावती देण्यात येत असून मोबाईलवर कर्जमाफीची कार्यवाही सुरू झाल्याचे एसएमएस येत आहेत. येथे आधार प्रमाणिकरणाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या याद्या २८ फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध होणार असल्याची माहिती श्री. बलसाणे यांनी दिली.   

शासनाने दिलेल्या कर्जमाफीमुळे आम्हा शेतकऱ्यांमध्ये नवी पिके घेण्याची उभारी निर्माण झाली असून कर्जमाफीमुळे ओझ कमी झाल्यासारखे वाटते.  -चंद्रभान पवार, सोंनाबे, ता. सिन्नर विविध कार्यकारी सेवा सोसायटीमधून सन २०१८ मध्ये कर्ज घेतले होते. काही करणास्तव मी हे पीककर्ज फेडू शकलो नाही. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या यादीत माझे नाव आहे. आज बँकेत येऊन आधार प्रमाणिकरण केले असता कर्जाची रक्कम खात्यावर जमा होण्याची कार्यवाही सुरू आहे, या योजनेमुळे १ लाख ६७ हजार इतके कर्ज माफ होणार आहे.  -अंजनाबाई खालकर, चांदोरी, ता. निफाड

मी सोसायटीकडून ५९ हजार रुपये कर्ज घेतले होते. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतून माझे हे कर्ज पूर्ण माफ झाले आहे.  - साहेबराव दामू गडाख, चांदोरी, ता. निफाड, 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com