औरंगाबाद जिल्ह्यातील एक लाख ३५ हजार खात्यांचे आधार प्रमाणीकरण

Aadhar certification of one lakh 35 thousand accounts in Aurangabad district
Aadhar certification of one lakh 35 thousand accounts in Aurangabad district

औरंगाबाद : जिल्ह्यात कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असून बुधवारपर्यंत (ता. ११) जवळपास १ लाख ३५ हजार १७९ खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले होते. तर ४३ हजार ४७४ खात्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम शिल्लक होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील विविध बॅंकांनी कर्जमाफीसाठी पात्र २ लाख १८ हजार ९५१ खाती पोर्टलवर अपलोड केली आहेत. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या १ लाख ४९ हजार ६५२ खात्यांसह बॅंक ऑफ महाराष्ट्रचे १५ हजार २५०, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे ४७७५, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे १२९६६, स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या २४ हजार १७, बॅंक ऑफ बडोदाचे ४५४१, बॅंक ऑफ इंडियाचे ३०५७ अलाहाबाद बॅंकच्या ९२९, आयडीबीआय ९९, आयसीआयसीआय २५६, एचडीएफसी ५२१, पंजाब नॅशनल बॅंक ६८०, युनियन बॅंक ५१२, कॅनरा बॅंक ३८१ आदी ठळक खात्यांसह इतर बॅंकाच्या कर्जमाफीसाठी पात्र खात्यांचा समावेश आहे. 

जिल्ह्यातील १२६७ गावांमधील १ लाख ७८ हजार ६५३ कर्जखात्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या. त्यामध्ये औरंगाबाद तालुक्‍यातील १७४ गावांतील १२८७०, गंगापूर तालुक्‍यातील १९५ गावांतील १९६३४, कन्नड तालुक्‍यातील १९३ गावांतील ३२२८९, खुल्ताबाद तालुक्‍यातील ६८ गावांतील ९९६१, पैठण तालुक्‍यातील १८२ गावांतील १७७०२, फुलंब्री तालुक्‍यातील ८८ गावांतील १४४७५, सिल्लोड तालुक्‍यातील १२८ गावातील ३१९४२, सोयगाव तालुक्‍यातील ७७ गावांतील १२३०५ तर वैजापूर तालुक्‍यातील १६२ गावांतील २७४७५ खात्यांचा समावेश होता. 

प्रसिद्ध करण्यात आलेल्या कर्जखात्यांच्या याद्यांपैकी १ लाख ३५ हजार १७९ खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले. जवळपास ४३ हजार ४७४ कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी असल्याची माहिती सहकार विभागाच्या वतीने देण्यात आली. ११ मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील १ लाख १ हजार ३३ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष कर्जमाफीची ४९५ कोटी ८१ लाख ११ हजार ९३१ रूपयांची रक्‍कम कर्जखात्यांवर हस्तांतरित झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. 

कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे ५६ हजार ६३०, बॅंक ऑफ बडोदा २६६२, बॅंक ऑफ इंडिया २१३४, बॅंक ऑफ महाराष्‌ट्र १०५१४, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया २२३१, आयसीआयसीआय बॅंक २१४, आयडीबीआय ६८३, महाराष्ट्र ग्रामीण बॅंक ९२०४, पंजाब नॅशनल बॅंक ३०, स्टेट बॅंक ऑफ इंडिया १५४९७, युनियन बॅंक ऑफ इंडिया ३५०, कॅनरा बॅंक २१२ यासह इतर बॅंकांच्या खात्यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com