Agriculture news in marathi Aagya bee conservation in Kolhapur, awareness of conservation | Agrowon

कोल्हापुरात आग्या मधमाशा जतन, संवर्धनाचा जागर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

आग्या मधमाशा जतन आणि संवर्धनासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पुढाकार घेतला घेतला आहे. आत्मा कृषी विभाग यांच्या वतीने आग्या मधमाशा जतन आणि संवर्धनावर सध्या काम सुरू आहे.

कोल्हापूर : आग्या मधमाशा जतन आणि संवर्धनासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पुढाकार घेतला घेतला आहे. प्रत्येक तालुक्यात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग यांच्या वतीने आग्या मधमाशा जतन आणि संवर्धनावर सध्या काम सुरू आहे. जिल्हाधिकारी देसाई यांच्या पुढाकारातून आग्या मधमाशा जतन आणि संवर्धनाचे काम जिल्ह्यात व्यापक स्तरावर सुरू आहे. शास्त्रीय पद्धतीने संकलित होणारा शुद्ध मध जिल्ह्यातील ग्राहकांना लवकरच उपलब्ध करण्याविषयी प्रयत्न सुरू आहेत. 

पारंपरिक पद्धतीला फाटा 
अजूनही आग्या मधमाशा पारंपरिक पद्धतीने काढल्या जात आहेत. मधाच्या हव्यासाने मधमाशांची पोळी जाळून, मोडून आणि काहीवेळा तर चक्क कीटकनाशके मारून मध काढला जातो. ही पारंपरिक पद्धत पूर्ण चुकीची असून, यामुळे मोठ्या प्रमाणात मधमाशा नष्ट होऊन शेतीला, जैव विविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. एकाही आग्या मधमाशीला न मारता शास्त्रीय पद्धतीने त्या पोळ्यातील मध अहिंसक पद्धतीने काढता येतो व पुन्हा मधमाशा त्याच पोळ्यामध्ये आपल्याला मध संकलित करून देतात. मधमाशा जगल्या तरच शुद्ध मध, मेण व इतर उपपदार्थ आपल्याला नैसर्गिकरित्या उपलब्ध होणार आहेत. 

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री होणार 
जिल्ह्यात प्रकल्प संचालक आत्मा कोल्हापूर सुनंदा कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन कदम, गिरोली, (ता. पन्हाळा) व ज्ञानदेव पाटील, खडूळे,( ता. गगनबावडा) हे तज्ज्ञ प्रशिक्षक आणि मध उद्योजक कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये प्रशिक्षण व प्रात्यक्षिक देण्याचे काम करीत आहेत. आग्या मधमाशी प्रशिक्षण कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविणेसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. कृषी विभाग, आत्मा यांचेकडून प्रथमच आग्या मधमाशा जतन आणि संवर्धनाचा हा उपक्रम पथदर्शी ठरणार आहे. यातून रोजगार निर्मिती, मधमाशा संवर्धन, मध उत्पादन, संकलन, प्रक्रिया, पॅकिंग, ब्रॅंडिंग, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री, परपरागीभवन या गोष्टींना चालना मिळणार आहे. 

प्रतिक्रिया

आग्या मधमाशांबद्दलची भीती घालवून शास्त्रोक्त पद्धतीने मधमाशांना कसलीही हानी न पोहोचू देता मध गोळा करण्याचे प्रशिक्षण पहिल्यांदाच मिळाले. 
-मोहन पडवळ, शेतकरी, मार्गेवाडी, ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर 

जिल्हाधिकारी देसाई यांच्या पुढाकारातून आग्या मधमाशा जतन आणि संवर्धन विषय गांभीर्याने घेतला आहे. त्यांच्या कल्पनेतून आणि सूचनेनुसार यावर येत्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात विशेष काम होणार आहे आणि त्या दृष्टीने सध्या आम्ही प्रयत्न करीत आहोत. 

-मोहन कदम, तज्ज्ञ मार्गदर्शक व मध उत्पादक, गिरोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर 


इतर ताज्या घडामोडी
नांदेडमध्ये ४२ हजार ६४९ क्विंटल हरभरा...नांदेड : जिल्ह्यात किमान हमी दरानुसार सुरू...
व्हर्च्युअल क्लासरूममुळे कृषी शिक्षणाची...नगर ः व्हर्च्युअल क्लासरूम आणि अॅग्री-दीक्षा वेब...
‘एमआरपी’नुसारच खतांची खरेदी करावी सोलापूर ः यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर...
खरीप हंगामासाठी ११४० कोटी रुपये पीककर्ज...अकोला : अकोला जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी ११४०...
सटाणा बाजार समिती आवाराबाहेर अवैध...नाशिक : सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही...
नाशिक जिल्ह्यात विहिरींनी गाठला तळ नाशिक : जिल्ह्यात गत मॉन्सूनमध्ये अनेक भागांत...
भोकरखेडात चार वर्षांपासून शेतकरी वीज...वाशीम : शेतात वीज जोडणी घेऊन सिंचन करता येईल....
टेंभू योजनेचे पाणी सोडले; ‘बंदिस्त पाइप...आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात टेंभू...
प्रत्येक गावाचा होणार कृषी विस्तार...जालना : कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाचे...
तमाशा कलावंतांसाठी सरसावले मदतीचे हात नगर ः : कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे टाळेबंदी...
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत चुरस सोलापूर ः पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा...
कांदा बाजारावर ‘कोरोना’चा परिणाम नगर : कोरोना व्हायरसची बाधा वाढत असल्याचा बाजार...
महाराष्ट्राला रेमडिसिव्हिर देण्यास ‘...मुंबई : केंद्र सरकारकडून रेमडिसिव्हिर निर्यातीवर...
डाळिंब सल्लाहस्त बहर उशिरा घेतला असेल तर फळांना बटर पेपर बॅग...
कृषी सल्ला : आंबा, काजू, नारळ, सुपारीनवीन आंबा लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील...
कृषी सल्ला : सुरु ऊस, कांदा, फळपिकेवातावरणातील उष्णता वाढल्यामुळे जनावरांच्या...
राज्यात उष्ण, ढगाळ हवामानसोमवार ते बुधवारपर्यंत (ता.१९ ते २१) १००८...
नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी वसंत...नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
देशात ‘जमीन सुपोषन व संरक्षण जनजागरण’...औरंगाबाद : संपूर्ण देशभरात मंगळवारपासून (ता. १३...
निराधार महिला शेतकऱ्यांसाठी ‘ट्रँक्टर...अमरावती : अचलपूर विधानसभा मतदारसंघातील निराधार,...