भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
बाजारभाव बातम्या
जळगावात आले प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये
जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.५) आल्याची १६ क्विंटल आवक झाली. दर ३००० ते ५००० व सर्वसाधारण ३००० रुपये प्रतिक्विंटल मिळाला.
जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.५) आल्याची १६ क्विंटल आवक झाली. दर ३००० ते ५००० व सर्वसाधारण ३००० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. आवक जळगाव, औरंगाबादमधील सोयगाव, यावल आदी भागातून होत आहे.
मंगळवारी बाजारात गवारीची दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल २००० ते ४००० व सर्वसाधारण ३००० रुपये मिळाले. भरताच्या वांग्यांची २३ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १२०० ते २२०० व सर्वसाधारण १५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
मेथीची चार क्विंटल आवक झाली. मेथीला प्रतिक्विंटल ६०० ते ९०० व सर्वसाधारण ५०० रुपये दर मिळाला. भेंडीची २४ क्विंटल आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंटल ११०० ते १५०० व सर्वसाधारण १००० रुपये दर होता. हिरव्या मिरचीची १७ क्विंटल आवक झाली.
तिला प्रतिक्विंटल २००० ते ३००० व सर्वसाधारण २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. पालकाची दीड क्विंटल आवक झाली. पालकला प्रतिक्विंटल १९०० रुपये दर मिळाला. दोडक्यांची नऊ क्विंटल आवक झाली.
दोडक्याला १४०० रुपये दर होता. लहान काटेरी वांग्यांची १७ क्विंटल आवक झाली. वांग्यांना सर्वसाधारण १८०० रुपये दर होता.
कोबीला सर्वसाधारण १७०० रूपये
कोबीची १४ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १५०० ते २५०० सर्वसाधारण १७०० रुपये, असा होता. भोपळ्याची १५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १७०० रुपये दर मिळाला. शेवगा शेंगांची दीड क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १४०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची १३ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल २२०० ते ३२०० व सर्वसाधारण २००० रुपये दर मिळाला.
- 1 of 67
- ››