नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले ६० दिवस दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्य
ताज्या घडामोडी
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये प्रतिक्विंटल
जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.१४) आल्याची २४ क्विंटल आवक झाली. दर २८०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. आवक जालना, औरंगाबाद व जळगाव जिल्ह्यातील जामनेर, यावल, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर आदी भागातून होत आहे.
जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.१४) आल्याची २४ क्विंटल आवक झाली. दर २८०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. आवक जालना, औरंगाबाद व जळगाव जिल्ह्यातील जामनेर, यावल, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर आदी भागातून होत आहे.
बाजारात मंगळवारी गवारीची दोन क्विंटल आवक झाली. गवारीला प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. हिरव्या मिरचीची १६ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल १८०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. पालकाची दिड क्विंटल आवक झाली. पालकाला प्रतिक्विंटल १४०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची १३ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १४०० ते २८०० रुपये दर मिळाला. बीटची सहा क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर होता.
काशीफळाची २१ क्विंटल आवक झाली. काशीफळांना प्रतिक्विंटल १००० ते १४०० रुपये दर मिळाला. मेथीची पाच क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २००० ते ३२०० रुपये दर मिळाला.
गिलक्यांची नऊ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १७०० ते २५०० रुपये दर मिळाला. भेंडीची १६ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर होता. भोपळ्याची ११ क्विंटल आवक झाली. भोपळ्याला प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाला. तोतापुरी आंब्यांची १८ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल २५०० ते ५५०० रुपये होता. दोडक्यांची ११ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर होता.
वांग्यांना १४०० ते २००० रूपये दर
लहान काटेरी वांग्यांची १८ क्विंटल आवक झाली. वांग्यांना प्रतिक्विंटल १४०० ते २००० रुपये दर होता. शेवगा शेंगांची पाच क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाला. कोबीची १८ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १६०० ते २३०० रुपये, असा होता.
- 1 of 1027
- ››