विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तान करणार सुटका, इम्रान खान यांची घोषणा

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तान करणार सुटका, इम्रान खान यांची घोषणा

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची उद्या (शुक्रवार) सुटका केली जाणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेने दिली.  भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी विमानाला पिटाळून लावण्यासाठी त्यांचा हवेतच पाठलाग करणारे एक मिग विमान पाकच्या हद्दीत कोसळले. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे या विमानाचे वैमानिक होते. तेव्हापासून अभिनंदन हे पाकिस्तानच्या ताब्यात होते. आता त्यांची सुटका उद्या (शुक्रवार) केली जाणार असल्याची माहिती पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी संसदेने दिली. 

वर्धमान यांना पकडल्यानंतर जबर मारहाण झाली होती. त्यांची रक्तबंबाळ अवस्थेतील अभिनंदन यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने खळबळ निर्माण झाली होती. अभिनंदन यांना परत आणा, अशी मागणी देशभरातून करण्यात येत होती. यांनतर पाकिस्तानवर जगभरातून दबाव निर्माण झाला होता, तसेच आंतरराष्ट्रीय जीनिव्हा करारामुळे त्यांचे हस्तांतर करणे पाकिस्तानला बांधिल होते. पाकिस्तानच्या निर्णयानंतर अभिनंदन यांना भारतात परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com