‘केव्हीके‘च्या तंत्रात उत्पन्न वाढविण्याची क्षमता : डॉ. लाखन सिंह

‘केव्हीके‘च्या तंत्रात उत्पन्न वाढविण्याची क्षमता : डॉ. लाखन सिंह
‘केव्हीके‘च्या तंत्रात उत्पन्न वाढविण्याची क्षमता : डॉ. लाखन सिंह

सोलापूर : ‘‘कृषिविज्ञान केंद्राने विकसित केलेल्या विविध तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत प्रयोग करावेत. छोटी छोटी; पण महत्त्वाची अशी ही तंत्रे आहेत, त्यांची क्षमता उत्पन्नवाढीसाठी महत्त्वाची आहे. त्या माध्यमातून शेतीमालाचे उत्पन्न दुप्पट करण्याची संधी आपल्याला मिळेल,'''' असे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या अटारी पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंह यांनी सांगितले.

शबरी कृषी प्रतिष्ठान संचालित कृषी विज्ञान केंद्रात शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक झाली. संस्थापिका ऊर्मिला गायकवाड अध्यक्षस्थानी  होत्या. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या संचालिका वैशाली गलांडे, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प सोलापूरचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. व्ही. एम. अमृतसागर, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे, बॅंक ऑफ इंडियाचे वरिष्ठ प्रबंधक रमेश साखरे, पशुसंवर्धन  विभागाचे अधिकारी डॉ. दैवज्ञ, राजाभाऊ देशमुख, धनंजय शेळके, अनिता माळगे, मुमताज मुलाणी उपस्थित होते. 

डॉ. लाखन सिंग म्हणाले, ‘‘कृषि विज्ञान केंद्राचे काम या परिसरातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आणि फायदेशीर ठरते आहे. शास्त्रज्ञ-शेतकरी संवादातूनच चांगले काही निर्माण होऊ शकते.'' विषय विशेषज्ञ प्रदीप गोंजारी, अमोल शास्त्री, समाधान जवळगे, विकास भिसे, डॉ. प्रकाश कदम, सौ. अनिता सराटे-शेळके, राजेंद्र नेहे, राजेंद्र वावरे, डी. एन. मूर्ती यांनी विषयाचे सादरीकरण केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com