हिंगोली जिल्ह्यातील सुमारे दीड लाख शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर

About 1.5 lakh farmers in Hingoli district approve crop insurance
About 1.5 lakh farmers in Hingoli district approve crop insurance

हिंगोली : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९ च्या खरीप हंगामातील सोयाबीन आणि ज्वारी या पिकांच्या नुकसानीबद्दल जिल्ह्यातील १ लाख ४९ हजार ३२९ शेतकऱ्यांना ११७ कोटी ६५ लाख १० हजार ४७८ रुपये पीकविमा परतावा मंजूर झाला आहे, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी बी. एस. कच्छवे यांनी दिली.

वसमत तालुक्यात पीकविमा लाभार्थींची संख्या सर्वाधिक ५१ हजार ५०० आहे. याच तालुक्यात सर्वाधिक ३५ कोटी ९४ लाख ३५ हजार ३७ रुपये एवढा विमा परतावा मंजूर झाला आहे. जिल्ह्यातील पाचपैकी हिंगोली, वसमत, ढा नागनाथ या तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि ज्वारी या पिकांच्या नुकसानीबद्दल पीकविमा परतावा मंजूर झाला आहे. कळमनुरी आणि सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनच्या नुकसानीबद्दल पीकविमा परतावा मंजूर झाला आहे.

ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे काढणीस आलेले सोयाबीन, वेचणीस आलेली कपाशी, ज्वारी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. विमा कंपनीने सर्व पाच तालुक्यांतील ८३ हजार ९८५ हेक्टरवरील सोयाबीनच्या नुकसानीबद्दल १ लाख ३१ हजार ८० हजार ९१२ शेतकऱ्यांना ११४ कोटी ५३ लाख २९ हजार ५६६ रुपयांचा विमा परतावा मंजूर केला. तीन तालुक्यांतील ३ हजार ५२९ हेक्टरवरील ज्वारीच्या नुकसानीबद्दल १७ हजार ३६२ शेतकऱ्यांना ३ कोटी ११ लाख ८० हजार ९१२ रुपयांचा विमा परतावा मंजूर केला आहे. परताव्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

पीकविम्याचे तालुकानिहाय लाभार्थी

तालुका लाभार्थी शेतकरी विमा परतावा रक्कम (कोटी) बाधित क्षेत्र (हेक्टर)
हिंगोली  १५२१७ १२.३३७४ ९१६६
कळमनुरी २९७८२ ३२.७१५२ २३०४०
वसमत ५१५०० ३५.९४३५ २७४८२
औंढानागनाथ  २८८३३ २१.१९३२  १३५२६
सेनगाव २३९९७ १५.४६१६ १४३०१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com