तब्बल २०० शेतकरी संत्रा निर्यातीसाठी तयार

About 200 farmers are ready for orange export
About 200 farmers are ready for orange export

नागपूर ः संत्रा निर्यातीकरिता अपेडाकडून ऑनलाइन गेटवेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विदर्भातील संत्रा उत्पादकांकडून याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, येत्या काळात तब्बल २०० बागायतदारांची नोंदणी यावर केली जाणार आहे. सद्यःस्थितीत मात्र पंजाबमधील किन्नो (संत्रा) उत्पादक एका शेतकऱ्यासह परभणी कृषी विद्यापीठअंतर्गत असलेल्या जालना जिल्ह्यातील बदनापूर मोसंबी संशोधन केंद्र अशा दोनच व्यक्‍तींची सिट्रसनेटवर नोंदणी आहे.

निर्यातक्षम उत्पादनांसाठी अपेडाकडून ऑनलाईन गेटवेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याआधारे निर्यातदार आणि शेतकऱ्यांमध्ये सेतू बांधणीच काम होते. निर्यातदारांना आपल्या भागातील निर्यातक्षम दर्जाचा शेतमाल पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती यावरून कळते. त्याकरिता अपेडाचा हा प्लॅटफार्म उपयोगी ठरला आहे. १ डिसेंबर २०१९ रोजी सिट्रसनेट हा गेटवे अपेडाकडून सुरू करण्यात आला. यावरील नोंदणीविषयीची माहिती नसल्याने अभोर (जि. फजीलका) येथील किन्नो (संत्रा) उत्पादक शेतकऱ्यासह बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्र अशा दोघांचीच नोंद झाली आहे. 

एकट्या विदर्भात सुमारे ८५ हजार हेक्‍टरवर उत्पादनक्षम संत्राबागा आहेत. राज्यात लिंबूवर्गीय फळपिकाखालील क्षेत्र दीड लाख हेक्‍टरवर आहे. परंतु शासनाने जोर लावल्यानंतर कधीमधी काही टन संत्र्यांची निर्यात होऊ शकली. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने मात्र संत्रा निर्यातीला येत्या काळात चालना मिळण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्याकरिता अपेडाकडून १ डिसेंबर २०१९ रोजी सिट्रसनेट हा गेटवे सुरू करण्यात आला.  

सिट्रनेटवर नोंदणी होत निर्यातीला चालना मिळावी याकरीता नागपूर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या पुढाकाराने वनामतीमध्ये दोन दिवसीय संत्रा निर्यात कार्यशाळा झाली.  यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणीला पसंती दिली.

औरंगाबाद, परभणी, जालना, नांदेड या भागांत मोसंबी होते. मोसंबी उत्पादकपट्ट्यातून निर्यातीला प्रोत्साहन मिळावे, याकरिता संशोधन केंद्राच्याच बागेची नोंदणी करण्यात आली. मोसंबी उत्पादकांमध्ये निर्यातीसाठी जागृती वाढावी, याकरिता हा प्रयत्न केला. मराठवाड्यात २९ हजार हेक्‍टरवर मोसंबी क्षेत्र फळधारणेखाली आहे. वातावरण तसेच जमीन या पिकासाठी पोषक असल्याने हा निर्णय घेण्यात आला. - संजय पाटील, प्रमुख, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर, जि. जालना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com