परभणी जिल्ह्यात सलग तिसऱ्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस

परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा (२०२१) जून ते आॅक्टोंबर या (वार्षिक) कालावधीत ११९६.४० मिमी म्हणजेच १४२.६१ टक्के पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचे यंदाचे हे सलग तिसरे वर्ष आहे.
Above average rainfall for the third year in a row in Parbhani district
Above average rainfall for the third year in a row in Parbhani district

परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा (२०२१) जून ते आॅक्टोंबर या (वार्षिक) कालावधीत ११९६.४० मिमी म्हणजेच १४२.६१ टक्के पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचे यंदाचे हे सलग तिसरे वर्ष आहे. यंदा सरासरीपेक्षा ३५७.४ मिमी जास्त पाऊस झाला आहे. अनेक वर्षांनंतरचा जिल्ह्यातील हा पावसाचा उच्चांक आहे.

२०१९ पर्यंत परभणी जिल्ह्याची जून ते आॅक्टोंबर या कालावधीत (वार्षिक) पडणाऱ्या पावसाची सरासरी ७७४.५९ मिमी होती.२०२० च्या मे महिन्यातील शासन निर्णयानुसार वार्षिक सरासरीत सुधारणा करण्यात आली. त्यानुसार  जानेवारी ते डिसेंबर या कालावधीतील सरासरी ९३०.३० मिमी, तर जून ते आॅक्टोंबर या कालावधीतील  सरासरी ८३८.९० मिमी आहे. मोसमी पावसाचा कालावधी जून ते सप्टेंबर महिन्याची सरासरी ७६१.३ मिमी आहे. परंतु यंदा ११०२.१ (१४४.८ टक्के) पाऊस झाला. आॅक्टोंबर महिन्याची सरासरी ७७.६० मिमी आहे. परंतु यंदा प्रत्यक्षात ९४.६१ मिमी पाऊस झाला. 

जिल्ह्यात २०१२ ते २०२१ या दहा वर्षाच्या कालावधीतील पाच वर्षात सरासरीपेक्षा कमी, तर पाच वर्षात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यंदा ऑगस्ट महिना वगळता सर्व महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. आॅगस्टमध्ये २२७.८० मिमी अपेक्षित असताना १४१.४ मिमी (६२.१ टक्के) पाऊस झाला. 

यंदा जिल्ह्यात २५ जुलै ते १५ आॅगस्ट या कालावधीत २२ दिवसांचा, तर २३ ते २९ आॅगस्ट या कालावधीत ७ दिवस असा एकूण २९ दिवस पावसाचा खंड  होता. 

हिंगोली जिल्ह्यात ११९०.७ मिमी पाऊस

हिंगोली जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर या कालावधीतील पावसाची सरासरी ८५९.६ मिमी आहे. यंदा (२०२१) प्रत्यक्षात ११९०.७ मिमी (१३८.५टक्के) म्हणजेच सरासरीपेक्षा ३३१.१ मिमी जास्त पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात सरासरी २४१.२० मिमी अपेक्षित असताना प्रत्यक्षात १५६.२ मिमी (६४.८ टक्के) पाऊस झाला. यंदा जिल्ह्यात ३० जून ते ७ जुलै, २६ जुलै ते ८ ऑगस्ट, २४ ते ३० ऑगस्ट या कालावधीत पावसाचा खंड होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com