Agriculture News in Marathi In the absence of government grants Sugar exports will increase this year | Page 4 ||| Agrowon

सरकारी अनुदान नसतानाही  यंदा साखर निर्यात वाढणार 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 डिसेंबर 2021

भारतात उपलब्ध असलेला जादा ऊस लक्षात घेता चालू गाळप हंगामात साखरेचे उत्पादन वाढणार आहे. अशा स्थितीत सरकारने निर्यातीला प्रोत्साहन अनुदान दिले नाही, तरी यंदा ७० लाख टन साखर भारताकडून निर्यात होण्याची शक्यता आहे.

पुणे ः भारतात उपलब्ध असलेला जादा ऊस लक्षात घेता चालू गाळप हंगामात साखरेचे उत्पादन वाढणार आहे. अशा स्थितीत सरकारने निर्यातीला प्रोत्साहन अनुदान दिले नाही, तरी यंदा ७० लाख टन साखर भारताकडून निर्यात होण्याची शक्यता आहे, असे मत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी जागतिक साखर परिषदेसमोर मांडले. 

लंडनमध्ये अलीकडेच झालेल्या या चारदिवसीय परिषदेत केंद्रीय अन्न मंत्रालयाचे सहसचिव सुबोध सिंग व गायकवाड यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. परिषदेतून परतल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना भारताच्या भूमिकेबद्दल तसेच परिषदेच्या कामकाजाविषयी साखर आयुक्तांनी माहिती दिली. 
‘‘भारत यंदा चांगल्या प्रमाणात साखर निर्यात करणार आहे. आतापर्यंत कच्च्या साखरेचे ३० लाख टनाचे करार झाले आहेत. याशिवाय ४५० कोटी लिटर्स इथेनॉल खरेदीच्या निविदादेखील निघालेल्या आहेत,’’ असे भारताने स्वतःहून या परिषदेत स्पष्ट केले. परिषदेत पहिल्या दोन दिवसात जागतिक दर्जावरील पिकांच्या व्यापाराचा आढावा घेण्यात आला. 

जगात सोयाबीन, गव्हाखालोखाल सर्वाधिक व्यापार साखरेचा होतो. इथेनॉल मिश्रणाबाबत जागतिक पातळीवर होत असलेल्या धोरणात्मक बाबींचे बारकावेदेखील या वेळी उलगडून सांगण्यात आले. साखर व इथेनॉलनिर्मितीत आता भारत एक मोठी ताकद होत असल्याने इतर देशांच्या नजरा भारताच्या भूमिकवर खिळलेल्या आहेत. 

साखर आयुक्त म्हणाले, ‘‘ब्राझील, पाकिस्तान, थायलंड व इतर जागतिक पातळीवरील साखर उत्पादक देशांकडून भारतीय साखर धोरणावर घेतले जात असलेले आक्षेप किंवा मागण्या अजूनही कायम आहेत. विशेषतः भारत सरकारने निर्यातीला अनुदान देऊ नये, अशी या देशांची मागणी आहे. या शिवाय आम्हाला भारतात मळीची निर्यात करू द्यावी, अशी मागणीही साखर उत्पादक देशांची आहे. भारताने सध्या साखरेच्या आयातीवर १०० टक्के सीमा शुल्क लावलेले आहे. ते कमी करण्याचा तगादा या देशानी लावलेला आहे.’’ 

इथेनॉलची चर्चा 
इंधनाबाबत इलेक्ट्रिक आणि इथेनॉल, अशा दोन्ही गटांत सुरू असलेल्या हालचाली व स्पर्धेचीही चर्चा झाली. युरोपने आता इथेनॉलकडे लक्ष द्यायला हवे, असा आग्रह या वेळी धरला गेला. इथेनॉलमुळे आता जगाच्या वाटचालीत ऊस हे एक ‘गेमचेंजर’ म्हणजेच डाव पलटविण्याची क्षमता असलेले पीक ठरण्याची चिन्हे आहेत. कारण नैसर्गिक वायूपासून आतापर्यंत मिळणाऱ्या सर्व बाबी उदाहरणार्थ, पांढरे घासलेट, पेट्रोल, डिझेल, विमानाचे इंधन आता ऊस, शर्कराकंद आणि अन्नधान्यापासून मिळण्याची मोठी शक्यता तयार झालेली आहे. त्यामुळे उसाचे महत्त्व यापुढे मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, असे सूतोवाच आयुक्त गायकवाड यांनी केले.


इतर अॅग्रो विशेष
जमीन सुपीकता, पीक फेरपालट हेच सूत्रअनियंत्रित पाणी, खतमात्रा वापरामुळे जमीन सुपीकता...
‘मध क्लस्टर’ निर्मितीसाठी सर्वतोपरी मदत...नाशिक : मधमाशीपालन हे अतिरिक्त रोजगाराचे साधन...
विलंब ‘एफआरपी’चे व्याज  कारखान्यांना...नांदेड : शेतकऱ्यांसोबत बेकायदा करार करून एफआरपीचे...
सोयाबीनसाठी चीनची अमेरिकेवर मदार? पुणे ः ब्राझील आणि अर्जेंटिनात यंदा सोयाबीन...
राज्यात गारठा पुन्हा वाढणार पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त...
महावितरण विरोधात कऱ्हाडमध्ये शुक्रवारी...कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांना बोगस, चुकीची...
द्राक्ष दराच्या निर्णयाची अंमलबजावणी...नाशिक : निर्यातक्षम द्राक्ष मालाच्या उत्पादन...
यंदा डाळिंब निर्यातदार  शेतकरी...सांगली ः राज्यातून डाळिंबाची निर्यात वाढण्यासाठी...
फळबाग लागवडीसाठी  आता सुधारित योजना पुणे ः फलोत्पादन वाटचालीत रोहयो फळबाग लागवडीनंतर...
कोविडमुक्त गाव अभियान पुणे विभागातही...पुणे : जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेने...
ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामांबाबत...अकोला ः राज्यातील ग्रामसेवकांकडे असलेली अतिरिक्त...
दळणासाठी नदीतून जीवघेणा प्रवासतळोदा, जि. नंदुरबार : सातपुड्यातील सावऱ्या दिगर...
वाळूदर येतील आवाक्यात  लिलाव कालावधी...मुंबई : राज्यात वाळूचा मुबलक पुरवठा आणि दरांमध्ये...
नगरमध्ये दीड लाख हेक्टरवर कांदा लागवडनगर ः नगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला...
तेलकट डागविरहित डाळिंब अन् बारमाही...तेलकट डाग, सूत्रकृमी किंवा अन्य कारणांमुळे...
भात उत्पादक शेतकऱ्यांचा इतर पिकांकडे कल...गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून कृषी तज्ज्ञ...
उसाच्या थकीत बिलासाठी तासगावात आंदोलनसांगली ः तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकीत...
चिखलदऱ्याच्या कॉफीला राज्यभरातून मागणीचिखलदरा, जि. अमरावती : कॉफी संपूर्ण महाराष्ट्रात...
बुलडाण्यातील शेतकरी पिकवतोय...बुलडाणा ः स्ट्रॉबेरी म्हटली की थंड वातावरणात...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढला असल्याने अनेक...