agriculture news in marathi Abundant water in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात मुबलक पाणी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

जळगाव :  जळगाव जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम सिंचन प्रकल्पांमध्ये मुबलक जलसाठा आहे. अनेक प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जळगाव :  जळगाव जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम सिंचन प्रकल्पांमध्ये मुबलक जलसाठा आहे. अनेक प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. १३ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. हतनूर व गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. रब्बीसाठी चांगला लाभ यंदा होईल, अशी स्थिती आहे. 

जिल्ह्यात अभोरा, मंगरूळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गुळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे तेरा मध्यम प्रकल्प आहेत. १३ प्रकल्पांमध्ये मुबलक जलसाठा आहे. हे प्रकल्प ऑगस्ट व सप्टेंबरमध्येच १०० टक्के भरले होते. ९६ लघु प्रकल्पांमध्ये पूर्ण पाणीसाठा आहे.  

जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा ७.२० टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये ७.०१ टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. 

जिल्ह्यातील ९६ लघु प्रकल्पात ६.२० टीएमसी उपयुक्त साठा आहे. जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये ३६.२७ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. हतनूर धरणाचे २ दरवाजे अर्धा मीटर, गिरणाचे २ दरवाजे अर्ध्या मीटरने तर वाघूरचे २ दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आले आहे. 

मोठ्या प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा ३६.२७ टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. यामध्ये हतनूर धरणात ९ टीएमसी, गिरणात १८.४९ टीएमसी, तर वाघूर धरणात ८.७८ टीएमसी इतका उपयुक्त साठा असून ही धरणे १०० टक्के भरून वाहत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...
आघाडीने चारली भाजपला धूळपुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या...
रत्नागिरीत जमिनीमध्ये नत्र, स्फुरदचे...रत्नागिरी ः जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह...