Agriculture news in marathi Abundant water in Pathrud dams | Agrowon

पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

पाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर साखळी सिमेंट बंधारे आभियानाअंतर्गत चार सिमेंट बंधारे मागील पाच - सहा वर्षापूर्वी बांधण्यात आले. गत काही दिवसांपासून दररोज चांगला पाऊस होत आहे. 

पाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर साखळी सिमेंट बंधारे आभियानाअंतर्गत चार सिमेंट बंधारे मागील पाच - सहा वर्षापूर्वी बांधण्यात आले. गत काही दिवसांपासून दररोज चांगला पाऊस होत आहे. यामुळे बंधाऱ्यांत मुबलक पाणीसाठा जमा झाले. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना त्याचा फायदा होईल. 

पाथरूड परिसरातील दुधना नदीवरती शासनाच्या साखळी सिमेंट बंधारे आभियानाअंतर्गत चार सिमेंट बंधारे बांधण्यात आले होते. परंतु, मागील काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळ पडत आहे. त्यामुळे ह्यामध्ये पाणीसाठा दिसून येत नव्हता. चालू वर्षात सुरुवातीपासून पावसाने चांगली साथ दिली. नदी, नाले - ओढ भरून वाहत आहेत. शिवारातील पाथरूड, दुधोडी, उमाचीवाडी, सावरगाव, बागलवडी, वडाचीवाडी, बेदरवाडी परिसरात चांगला पाऊस झाला. नदी, नाले, ओढे यांना पाणी वाहत असल्याचे दिसून येते आहे. 

पाथरुड येथील नदिवर वैजीनाथ मंदिर, विठ्ठल मंदिर, ईट रस्ता व कडानीचा डोह या भागात सिमेंट बंधारे आहेत. पाण्याने तुडूंब भरून वाहत आहेत. नदी परिसरातील विहिरी व कूपनलिकेच्या पाणीपातळीत चांगली वाढ होऊ लागली आहे. या पाण्याचा फायदा रब्बी हंगामातील ज्वारी, गव्हू, हरभरा, ऊस, पाले-भाज्यांना झाला आहे. तलाव क्षेत्रात ऊस व फळबाग लागवडीचे प्रमाण वाढले आहे. निर्माण झालेल्या पाणीसाठ्याचा उपयोग रब्बी हंगामातील पिकांना होणार आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...
सोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...
सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...
सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...
निळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...