agriculture news in marathi Abundant water reserves in drought prone areas of Khandesh | Agrowon

खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  प्रकल्प यंदाही बऱ्यापैकी भरले आहेत.  जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील अंजनी प्रकल्प १०० टक्के भरला आहे.

जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  प्रकल्प यंदाही बऱ्यापैकी भरले आहेत.  जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील अंजनी प्रकल्प १०० टक्के भरला आहे. नदीत प्रवाही पाणी असून, दोन दिवसांपूर्वी अंजनी नदीला चांगला पूर आला होता. तर पारोळा तालुक्यातील भोकरबारी प्रकल्पदेखील सुमारे ८६ टक्के भरला आहे. 

जामदा बंधाऱ्यातून या प्रकल्पात पाणी सोडण्यात आले होते. त्यासाठी एरंडोल व अमळनेर भागातील लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. साक्री (जि.धुळे) तालुक्यातील बुराई प्रकल्पदेखील ९० टक्के भरला आहे. हा प्रकल्प गेल्या वर्षी सुमारे सात वर्षानंतर पूर्ण भरला होता. जूनमध्ये बुराई प्रकल्पात जेमतेम जलसाठा शिल्लक राहीला होता.

साक्री, धुळे भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. परंतु हा प्रकल्प रिकामाच होता. हा प्रकल्प आवर्षणप्रवण भागात आहे. नंदुरबार व साक्री तालुक्याच्या सीमेनजीक हा प्रकल्प असून, त्याच्या लाभक्षेत्रात पाऊस जेमतेम होत असतो. परंतु त्यातही समाधानकारक जलसाठा आहे. अंजनी, भोकरबारी, बुराई या प्रकल्पांची साठवण क्षमता प्रत्येकी दोन, २.११, तीन टीएमसी एवढी आहे. 

तापी व गिरणा नदीत प्रवाही पाणी आहे. गिरणा नदीसह जामनेरातील वाघूर, शिरपूर (जि.धुळे) येथील अनेर, साक्री भागातून येणाऱ्या पांझरा, शहादा (जि.नंदुरबार) मधील सुसरी, गोमाई, तळोदा भागातील खरडी, रावेर (जि.जळगावमधील) सुकी, यावल (जि.जळगाव) मधील मोर, चोपडा (जि.जळगाव) मधील सातपुडा पर्वतातून येणारी गूळ या नद्यांना प्रवाही पाणी आहे. 

हे प्रकल्प १०० टक्के भरले 

जळगाव जिल्ह्यातील गिरणा, बहुळा, अग्नावती, हिवरा, तोंडापूर, सुकी, अभोरा, मंगरूळ, गारबर्डी, मोर, गूळ, तोंडापूर, अंजनी हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. धुळ्यातील अनेर, पांझरा, कनोली, मालनगाव, सोनवद, नंदुरबारमधील दरा, रंगावली, सुसरी या प्रकल्पात १००टक्के जलसाठा आहे. तापी नदीवरील भुसावळ (जि.जळगाव) नजीकच्या हतनूर धरणातही १०० टक्के जलसाठा आहे. त्यात पाण्याची आवक सुरू असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पण हा विसर्ग पुढे बंद होण्याचे संकेत आहे.


इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी, संगमेश्‍वरसाठी भात खरेदी सुरूरत्नागिरी  : रत्नागिरी व संगमेश्‍वर...
खानदेशात यात्रांअभावी अनेकांवर...सोनगीर, जि. धुळे  : खानदेशात पावसाळा वगळता...
नाशिक जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीसाठी...गिरणारे, जि. नाशिक : खरीप हंगामातील भात, भुईमूग,...
खांबाळे, पडवणे येथील आंबा, काजूची ६००...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील खांबाळे (ता....
बोडखा येथे ‘स्वाभिमानी’चे झाडावर...बुलडाणा : केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी...
औरंगाबादमध्ये केंद्राच्या कृषी...औरंगाबाद : केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी...
खानदेशात सव्वा लाख हेक्टरवर पेरणीजळगाव : खानदेशात मक्याची लागवड सुरूच आहे. रब्बी...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीच्या...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
नाशिक विभागात रोज एक लाख टन उसाचे गाळपनगर  ः नाशिक विभागातील ३२ पैकी २५ साखऱ...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची ३४ हजार...औरंगाबाद : राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या...
कृषी कायद्यांविरोधात साताऱ्यात धरणेसातारा : शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी...
जालना जिल्ह्यात दहा हजार क्‍विंटलवर...जालना : ‘‘जिल्ह्यात मक्याची किमान आधारभूत...
महिनाभर जमीन आरोग्य सुधार अभियानऔरंगाबाद : जमिनीच्या सुपीकतेवर भर देण्याची गरज...
गहू, ज्वारी पिकांवरील खोडमाशीचे...बहुतांश ठिकाणी गहू व ज्वारी पिकाची पेरणी झाली आहे...
पिकाच्या संवेदनशील अवस्थेनुसार पाणी...रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात लसूण ५००० ते १३००० रुपयेनाशिकमध्ये ६२०० ते ११५०० रुपये  नाशिक :...
उत्तम भाजीपाला उत्पादनासाठी पोषक हवामानवाटाणा वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या...
बहिरम यात्रा अखेर रद्दअमरावती : लाखो भाविकांचे कुलदैवत आणि विदर्भात...
महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची...सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात...
विधान परिषदेच्या सहा जागांचा आज निकालमुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर,...