Agriculture news in marathi Abundant water reserves in Khandesh | Page 2 ||| Agrowon

खानदेशात जलसाठा मुबलक 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 मार्च 2021

खानदेशात विविध प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये मुबलक जलसाठा आहे. त्यामुळे टंचाई यंदा कमी असणार आहे. तसेच पाण्याचे तिसरे आवर्तनही मिळेल, असे निश्चित मानले जात आहे. 

जळगाव : खानदेशात विविध प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये मुबलक जलसाठा आहे. त्यामुळे टंचाई यंदा कमी असणार आहे. तसेच पाण्याचे तिसरे आवर्तनही मिळेल, असे निश्चित मानले जात आहे. 

जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पातून दोनदा, गिरणातून दोनदा सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. तसेच नदीकाठची गावे, विविध पालिका, प्रकल्पांसाठी देखील या धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे. गिरणा धरणावर चाळीसगाव, पाचोरा, भडगाव येथील पाणी योजनांचे स्त्रोत अवलंबून आहेत. तसेच शंभर गावांमधील टंचाई निवारणार्थ गिरणा धरणातून नदीच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजेच कानळदा, नांद्रा बुदूकपर्यंत (ता. जळगाव) पाणी सोडावे लागते. हतनूर धरणावर भुसावळ, साकेगाव येथील पाणी योजनांचे स्त्रोत अवलंबून आहेत. तसेच आयुध निर्माणी, दीपनगर (ता. भुसावळ) येथील विद्युत प्रकल्पासाठी देखील या धरणातून पाणी सोडावे लागते. यापूर्वी रब्बीसाठी दोनदा आवर्तने प्रकल्पातून सोडलेली आहेत. तरीही सध्या ५६ टक्क्यांवर जलसाठा आहे. 

गिरणा धरणातील साठाही ५८ टक्क्यांवर आहे. वाघूर धरणातून रब्बीसाठी दोनदा आवर्तन सोडले आहे. काही गावांमध्ये मात्र पाणी प्रकल्पाच्या बांधकामाच्या अडचणीमुळे सोडले नाही. वाघूर धरणाच्या माध्यमातून जळगाव, भुसावळला पाणीपुरवठा केला जातो. तसेच पाइप कारखान्यासाठीदेखील पाणी सोडले जाते. हतनूर व गिरणातून या महिन्याच्या अखेरीस रब्बीसाठी तिसरे आवर्तन सोडले जाईल. तसेच पाणी योजनांसाठीदेखील नदीत पाणी सोडले जाणार आहे.

धुळ्यातील अनेर प्रकल्पातील जलसाठाही ५७ टक्क्यांवर आहे. यातूनही रब्बीसाठी दोनदा आवर्तन सोडले असून, तिसरे आवर्तन सोडले जाईल. तसेच उन्हाळी हंगामात भुईमूग, बाजरीसाठीदेखील पाणी सोडले जाईल. पांझरा प्रकल्पातूनही रब्बीसाठी एक आवर्तन सोडले जाणार आहे. या प्रकल्पातही सुमारे ५७ टक्के जलसाठा असल्याची माहिती मिळाली.

इतर मध्यम प्रकल्पांमध्येही खानदेशात मुबलक जलसाठा आहे. त्यात धुळ्यातील अमरावती, सोनवद, मालनगाव, बुराई या प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच नंदुरबारमधील दरा, सुसरी प्रकल्पातही मुबलक पाणी आहे. खानदेशातील प्रकल्पांमधील जलसाठा एकूण ५३ टक्क्यांवर आहे. उन्हाळ्याचे तीन महिने राहिले आहेत. या स्थितीत पाणी मुबलक असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
डाळिंब अंबिया बहरातील कीड- रोग...डाळिंब बागेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...
कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन...नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती...
पालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून...