जतमध्ये यंदा मुबलक पाणीसाठा

जत तालुक्यात २७ प्रकल्प असून, २५३७.८२ दशलक्ष घनफूट इतके साठवण क्षमता आहे. या प्रकल्पात १९५०.४६ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपयुक्त आहे. तालुक्यात झालेल्या पावसाने काही तलाव भरले आहेत.
जतमध्ये यंदा मुबलक पाणीसाठा Abundant water supply in Jat this year
जतमध्ये यंदा मुबलक पाणीसाठा Abundant water supply in Jat this year

सांगली : जत तालुक्यात २७ प्रकल्प असून, २५३७.८२ दशलक्ष घनफूट इतके साठवण क्षमता आहे. या प्रकल्पात १९५०.४६ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपयुक्त आहे. तालुक्यात झालेल्या पावसाने काही तलाव भरले आहेत. तर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी तलावात सोडले असल्याने तालुक्यातील प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील द्राक्ष, डाळिंबासह अन्य पिकांना मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  जत तालुका तसा विस्ताराने मोठा आहे. नेहमी दुष्काळ अशी या तालुक्याची ओळख आहे. अनेक वर्षांपासून जत तालुका तहानलेलाच पहायला मिळत आहे. पाण्यासाठी भटकंती करताहेत. पाण्याची टंचाई भासवण्यासाठी शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासन टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. शेतीच्या पाण्यासाठी पैसे देऊनही टॅंकर मिळत नव्हते. त्यामुळे पाण्यासाठी अनेकदा संघर्ष देखील झाला. परंतु, पाण्यचा प्रश्न मार्गी लागला नाही. इथली संपूर्ण शेती पावसाच्या भरवशावर आहे. परतीचा पाऊस झाला तरच रब्बी हंगामातील पीक शेतकऱ्यांच्या हातात येतात, अशी परिस्थिती आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत या तालुक्यात परतीच्या पावसाने मोठा दिसाला मिळाला आहे. गेल्या तीन वर्षांत या तालुक्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत नसल्याचे चित्र आहे. तलावात कमी अधिक पाणीसाठा शिल्लक राहतो आहे. गेल्या वर्षी देखील परतीच्या पावसाने जत तालुक्यावर कृपादृष्टी दाखवली. त्यामुळे तलाव शंभर टक्के भरले. तालुक्यातील भूगर्भातील पाणी पातळीत देखील काही प्रमाणात वाढली आहे. दरम्यान, पिण्यासाठी टॅंकरची आवश्यकता भासली नसल्याचे दिसते आहे. २०१९पासून पुराचे वाहून जाणारे पाणी हे जत तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यात म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करुन देण्याचे नियोजन पाटबंधारे विभाग करत आहे. यंदा पाणी टंचाई भासू नये यासाठी पाटबंधारे विभागाने म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करुन तलाव भरण्याचे नियोजन केले, त्यामुळे जत तालुक्यातील तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या पाणीसाठा मुबलक असल्याने द्राक्ष, डाळिंब पिकासह अन्य पिकांना याचा फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यंदा देखील पाणीटंचाई भासणार नाही, असे चित्र सध्यातरी दिसते आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com