Agriculture News in Marathi Abundant water supply in Jat this year | Page 2 ||| Agrowon

जतमध्ये यंदा मुबलक पाणीसाठा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 ऑक्टोबर 2021

जत तालुक्यात २७ प्रकल्प असून, २५३७.८२ दशलक्ष घनफूट इतके साठवण क्षमता आहे. या प्रकल्पात १९५०.४६ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपयुक्त आहे. तालुक्यात झालेल्या पावसाने काही तलाव भरले आहेत.

सांगली : जत तालुक्यात २७ प्रकल्प असून, २५३७.८२ दशलक्ष घनफूट इतके साठवण क्षमता आहे. या प्रकल्पात १९५०.४६ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपयुक्त आहे. तालुक्यात झालेल्या पावसाने काही तलाव भरले आहेत. तर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी तलावात सोडले असल्याने तालुक्यातील प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील द्राक्ष, डाळिंबासह अन्य पिकांना मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

जत तालुका तसा विस्ताराने मोठा आहे. नेहमी दुष्काळ अशी या तालुक्याची ओळख आहे. अनेक वर्षांपासून जत तालुका तहानलेलाच पहायला मिळत आहे. पाण्यासाठी भटकंती करताहेत. पाण्याची टंचाई भासवण्यासाठी शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासन टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. शेतीच्या पाण्यासाठी पैसे देऊनही टॅंकर मिळत नव्हते. त्यामुळे पाण्यासाठी अनेकदा संघर्ष देखील झाला. परंतु, पाण्यचा प्रश्न मार्गी लागला नाही. इथली संपूर्ण शेती पावसाच्या भरवशावर आहे. परतीचा पाऊस झाला तरच रब्बी हंगामातील पीक शेतकऱ्यांच्या हातात येतात, अशी परिस्थिती आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षांत या तालुक्यात परतीच्या पावसाने मोठा दिसाला मिळाला आहे. गेल्या तीन वर्षांत या तालुक्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत नसल्याचे चित्र आहे. तलावात कमी अधिक पाणीसाठा शिल्लक राहतो आहे. गेल्या वर्षी देखील परतीच्या पावसाने जत तालुक्यावर कृपादृष्टी दाखवली. त्यामुळे तलाव शंभर टक्के भरले.

तालुक्यातील भूगर्भातील पाणी पातळीत देखील काही प्रमाणात वाढली आहे. दरम्यान, पिण्यासाठी टॅंकरची आवश्यकता भासली नसल्याचे दिसते आहे. २०१९पासून पुराचे वाहून जाणारे पाणी हे जत तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यात म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करुन देण्याचे नियोजन पाटबंधारे विभाग करत आहे. यंदा पाणी टंचाई भासू नये यासाठी पाटबंधारे विभागाने म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करुन तलाव भरण्याचे नियोजन केले, त्यामुळे जत तालुक्यातील तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या पाणीसाठा मुबलक असल्याने द्राक्ष, डाळिंब पिकासह अन्य पिकांना याचा फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यंदा देखील पाणीटंचाई भासणार नाही, असे चित्र सध्यातरी दिसते आहे.


इतर बातम्या
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कृषी समितीच्या...सिंधुदुर्गनगरी ः ‘‘बियाणे किट वितरण आणि...
सांगली जिल्ह्यात ‘किसान सन्मान’ची वसुली...सांगली : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील अपात्र...
सिद्धेश्‍वर कारखान्याच्या चिमणी ...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात गाळपात...औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड...
मराठवाड्यातील ८७५ मोठ्या, मध्यम, लघू...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७५ मोठ्या, मध्यम, लघू...
नाशिक ः सिन्नरच्या पाणी प्रकल्पाचा...नाशिक : नाशिक व सिन्नरच्या विकासासाठी आवश्यक पाणी...
जळगाव जिल्ह्यात १७ हजार बेडची सज्जता जळगाव ः जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या...
नांदेड जिल्ह्यात पाच लाख खातेदारांना ‘...नांदेड जिल्ह्यात : पंतप्रधान किसान सन्‍मान निधी (...
निविष्ठा परवान्यांमधील ‘दुरूस्ती’ आता...पुणे ः गुणनियंत्रण विभागातील गैरव्यवहाराला आळा...
ऊसतोड वजावट रद्द करावी पुणे : राज्यात यंत्राच्या साहाय्याने होणारी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची...पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने गारठा वाढला...
गोदावरी-वैनगंगा नदीजोड प्रकल्प अद्याप...नागपूर : महागाई आणि भूखंडाच्या दरापेक्षाही वेगाने...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द झाल्यानंतर आता मोदी...
कृषी कायदे मागे घेण्यावर संसदेचे...नवी दिल्ली ः संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
वीजजोड जबरदस्तीने तोडल्यास जशास तसे...सांगली ः महावितरण कंपनीने शेतीपंपांची वीजबिल वसूल...
राजस्थानमधील शेतकऱ्यांची  मोहरी आणि...पुणे ः रब्बी हंगाम २०२०-२१ मधील मोहरी आणि गव्हाला...
गोदावरी, पैनगंगा उपखोऱ्याची तूट भरून...औरंगाबाद ः ‘‘गोदावरी, पैनगंगा उपखोऱ्याची तूट भरून...
कृषी विजबिले अवास्तवअकोला ः ग्रामीण भागात सध्या एकीकडे रब्बीची लगबग...
खानदेशात अनेक गावांमधील शिवारात वीज बंद जळगाव ः  खानदेशात जळगाव, धुळे, नंदुरबारमधील...
अवकाळीच्या सावटामुळे द्राक्ष पट्ट्यात...नाशिक : गेल्या काही वर्षांपासून पूर्वहंगामी...