Agriculture News in Marathi Abuse of power Everyone can see | Page 2 ||| Agrowon

सत्तेचा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसतो आहे : शरद पवार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 ऑक्टोबर 2021

ईडीच्या नावाखाली त्रास दिला जातो, ज्यांच्या हाती सत्ता आहे. त्यांच्याकडून होणारा सत्तेचा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसतो आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. ८) भाजपला फटकारले. 

सोलापूर : ‘‘निवडणुकी आधी मला ईडीची नोटीस पाठवली, ज्या बॅंकेशी माझा काहीही संबंध नव्हता, त्यात मला ओढले. काल अजित पवारांकडेही सरकारी पाहुणे आले. सरकारी पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडले जाते, ईडीच्या नावाखाली त्रास दिला जातो, ज्यांच्या हाती सत्ता आहे. त्यांच्याकडून होणारा सत्तेचा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसतो आहे,’’ अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. ८) भाजपला फटकारले. 

पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सोलापुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी कॉंग्रेसच्या माजी महापौर नलिनी चंदेले, सुधीर खरटमल या नेत्यांसह शिवसेना, भाजप आणि कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पवार म्हणाले, ‘‘जवाहरलाल नेहरुंच्या काळात पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर देण्यात आला. पण आज मोदी सरकार मात्र त्याच्या विरुद्ध काम करताना दिसत आहेत. रेल्वे, बंदर, विमानतळांचे खासगीकरण करत सुटले आहेत. दळणवळणाच्या सुविधांतही खासगीकरण वाढते आहे. व्यापाऱ्यांच्या हातात सूत्रे दिली जात आहेत. दुसरीकडे महागाई वाढत आहे. त्याचा सर्वसामान्यांसह सर्वच घटकावर परिणाम होत आहे. या सरकारला विरोध करण्याची भूमिका घ्यावी लागेल. त्यासाठी भाजपविरुद्ध सर्वांनी एकत्र आले पाहिजे.’’ 

सोमवारच्या बंदमध्ये सहभागी व्हा
उत्तर प्रदेशातील लखीमपूरच्या घटनेवर पवार म्हणाले, ‘‘शांततेच्या मार्गाने शेतकरी आंदोलन करत असताना शेतकऱ्यांना थेट गाडीखाली चिरडले जाते. भाजपच्या नेत्यांनी केलेल्या या हत्याच आहेत. संताप वाटेल, असाच हा प्रसंग आहे. शेतकऱ्यांविषयी यांना कोणतीच आस्था नाही, ना त्यांच्या प्रश्‍नांविषयी भान नाही. भाजपचा निषेध करण्यासाठी सोमवारी बंद पुकारला आहे. त्यात शांततेच्या मार्गाने सहभागी व्हावे.’’  


इतर ताज्या घडामोडी
मुंबई विमानतळावरून होणार दैनंदिन ६६०...मुंबई : कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने...
बैलगाडा शर्यतप्रकरणी सोमवारी सुनावणी राजगुरुनगर, जि. पुणे : बैलगाडा शर्यत बंदीविरोधात...
वाढीव वीजबिलांबाबत शेतकऱ्यांनी घेतली...मंगरूळपीर, जि. वाशीम : तालुक्यातील कासोळा,...
वऱ्हाडात आता विधान परिषद निवडणुकीचा बार अकोला : विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक...
सांगलीत एकावन्न हजार शेतकऱ्यांना १४...सांगली : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत...
उस्मानाबाद जिल्ह्यात पीकविम्यावरून...उस्मानाबाद : जिल्हा प्रशासन व पीकविमा कंपनीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव सुरूनाशिक : जिल्ह्यातील बाजार समिऱ्यांमध्ये कांदा...
रत्नागिरीतील १५०३ गावांची पैसेवारी ५०...रत्नागिरी : खरीप हंगामात भातपीक घेणाऱ्या गावातील...
शेतकऱ्यांनो, ऊसतोडी घेऊ नका : पाटीलकऱ्हाड, जि. सातारा : साखर कारखान्यांनी एकरकमी...
जळगावात महाविकासच्या ‘सहकार’ला...जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भारतीय जनता...
कापसाला यंदा दर; मात्र उत्पादकतेत मोठी...अकोला : कापसाचा दर वाढल्याने बाजारपेठेत उत्साही...
विठोबा शेतकरी गटाकडून सेंद्रिय...नांदेड : कोरोनाच्या काळात सेंद्रिय पद्धतीने...
अमरावती विभागात १२८९ गावांची पैसेवारी...अमरावती : या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी व...
सरकार आणि साखर कारखानदारांना विरोधात...परभणी : मराठवाड्यातील अनेक कारखान्यांनी यंदा अजून...
सांगली जिल्हा बँक निवडणूक : अठरा...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी तीन...
शेतकऱ्यांचे ८० लाख रुपये घेऊन...गोवर्धन, जि. नाशिक : गिरणारे येथील एका...
राज्यात दुधाच्या गुणवत्तेबाबत तडजोड...संगमनेर, जि. नगर : राज्यात दुधाच्या शुद्धतेबाबत...
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा...जळगाव : जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीवर...
परभणीत केवळ ७६७ टन डीएपी शिल्लक परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामातील सरासरी खताच्या...
निर्यातक्षम फळनिर्मितीतूनच शेतकऱ्यांची...नागपूर : शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता...