agriculture news in marathi Academic year will starts from june : CM Uddhav Thackeray | Agrowon

शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 जून 2020

 ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते थांबवले जावू नये. नवीन शैक्षणिक वर्ष जून महिन्यातच सुरू केले जावे,’’ असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते थांबवले जावू नये. नवीन शैक्षणिक वर्ष जून महिन्यातच सुरू केले जावे,’’ असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ‘‘ज्या भागात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरू करता येणार नाहीत, त्यांनी ऑनलाईन आणि जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, इंटरनेट कनेक्टिव्हिटी फार चांगली नाही त्या दुर्गम भागात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात,’’ अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता.३१) व्हीसीद्वारे शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार कपिल पाटील, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्यासह रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल पाटील, अनिरुद्ध जाधव तसेच इतर शिक्षण तज्ज्ञही उपस्थित होते.

या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरू न करताही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही याची काळजी घ्यावी आणि त्याच दिशेने नवीन शैक्षणिक वर्षाची आखणी करावी अशी सूचना केली.

‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे. मुलांचे वर्ष वाया जाऊ देता येणार नाही. ज्या ठिकाणी प्रत्यक्षात शाळा सुरू करता येणार नाहीत, त्याठिकाणी ऑनलाईन किंवा इतर पर्यांयांनी शाळा सुरू करता येऊ शकतील. दुर्गम भागांत जिथे इंटरनेट कनेक्टिविटी नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून शाळा सुरू होऊ शकतील,’’ असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

सुरुवातीला गूगल प्लॅटफॉर्मचा प्रायोगिक स्तरावर वापर केला तरी स्वतंत्रपणे संगणकीय पद्धती विकसित करून ऑनलाईन शिक्षणाची मजबूत यंत्रणा दीर्घ काळासाठी विकसित करावी, असेही या बैठकीत त्यांनी स्पष्ट केले. 


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटातजळगाव  ः जिल्ह्यात रोज सुमारे साडेसहा लाख...
जळगावात पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथजळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
`औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीची मुदत...औरंगाबाद : झालेली मका खरेदी व बाकी असलेली...
धुळे जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा...देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर...
सांगलीत दुग्ध व्यवसाय बंद पडण्याच्या...सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य...
सिंधुदुर्गात दुध संकलनाची शासकीय...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या...
कोल्हापुरात बिलांअभावी...कोल्हापूर : दुध संघांकडून वेळेत बिले मिळत...
‘पीकविमा प्रस्तावासाठी जनसुविधा केंद्र...नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी)...
परभणीत दर कपातीमुळे दूध उत्पादकांसमोर...परभणी : शासकीय दुग्धशाळेतील दूधाचे दर स्थिर आहेत...
सोलापुरात पावसाने जूनची सरासरी केली...सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली...
भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील...सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा...
पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे...पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे....
हिंगोलीत ‘कर्जमुक्ती’तून ७० हजार...हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
साताऱ्यात कमी दूध दरामुळे उत्पन्न,...सातारा ः दुष्काळग्रस्त तसेच बागायती भागातील...
कृषी केंद्रात दरफलक नसल्यास...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’ने केली वीज...सोलापूर : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात...
नगर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक मेटाकुटीलानगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू...
पदरमोड करून दूध व्यवसाय करण्याची...सोलापूर  ः चारा व पशुखाद्याच्या वाढत्या...
कोल्हापुरात वाढीव वीज बिलांची होळीकोल्हापूर : वाढीव वीज बिलांविरोधात येथील...