पीक कर्ज वितरणाला गती द्यावी : ॲड. ठाकूर

अमरावती : शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी आधार प्रमाणीकरणाचे उर्वरित काम पूर्णत्वास न्यावे. बँकांकडून कर्जवितरणाच्या कामाला गती द्यावी.
Accelerate crop loan disbursement: Adv. Thakur
Accelerate crop loan disbursement: Adv. Thakur

अमरावती  : शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी आधार प्रमाणीकरणाचे उर्वरित काम पूर्णत्वास न्यावे. बँकांकडून कर्जवितरणाच्या कामाला गती द्यावी. शेतकरी बांधवांची अडचण जाणून त्यांना कर्ज मिळवून देण्यात सहकार्य करावे. अनावश्यक कागदपत्रांची मागणी करू नये, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.  

जिल्ह्यातील कापूस खरेदी, पीक कर्ज वितरण, कर्जमुक्ती योजना अंमलबजावणी, हरभरा खरेदी, वन हक्क कायदा विविध विषयांचा आढावा ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा, राज्य पणन महासंघाच्या जिल्हा विपणन अधिकारी कल्पना धोपे, विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे विभागीय व्यवस्थापक देशपांडे, राज्य वखार महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक टोपे आदी उपस्थित होते.

ठाकूर म्हणाल्या, जिल्ह्यात अद्यापपर्यंत ६४६ कोटी रूपये पीक कर्ज वितरण झाल्याचे दिसते. हे प्रमाण उद्दिष्टाच्या केवळ ३८ टक्के आहे. ही स्थिती बदलण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांकडून एकत्रित प्रयत्न होऊन पतपुरवठ्याला गती आणावी. जिल्ह्यात पीक कर्ज वितरण उद्दिष्टानुसार पूर्ण झाले पाहिजे. याबाबत बँकांनी संवेदनशीलता दाखवून काम केले पाहिजे. आवश्यक कागदपत्रांची यादी यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. त्यामुळे अनावश्यक कागदपत्रांची मागणी करू नये. कर्जमुक्ती योजनेत १ लाख ११ हजार खातेदारांचे आधार प्रमाणीकरण झाले. उर्वरित कार्यवाही वेळेत पूर्ण करून घ्यावी. संबंधित खातेदारांपर्यंत आवश्यक माहिती पोहोचवून प्रमाणिकरणाची कार्यवाही पूर्ण करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

शेतकऱ्यांना हरभऱ्याचे पैसे तत्काळ द्या

हरभरा खरेदीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना तत्काळ पैसे मिळण्यासाठी कार्यवाही व्हावी, असे निर्देश ठाकूर यांनी दिले. त्या म्हणाल्या, हे पैसे मिळण्यात विलंब होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत खरेदी झालेला संपूर्ण माल गोदामात ठेवून वखार महामंडळाने तत्काळ त्याच्या पावत्या नाफेडला पाठवाव्यात जेणेकरून पुढची प्रक्रिया होईल व शेतकरी बांधवांना पैसे मिळू शकतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com