कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीला गती द्या : यशोमती ठाकूर

कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीला गती द्या : यशोमती ठाकूर
कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीला गती द्या : यशोमती ठाकूर

अमरावती  :  महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची गतीने अंमलबजावणी करावी. अतिवृष्टी व अवेळी पावसाने झालेल्या नुकसानीचे स्वतंत्र सर्वेक्षण करावे, असे निर्देश महिला व बालविकासमंत्री तसेच पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, महापौर चेतन गावंडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, आमदार रवी राणा, आमदार सुलभा खोडके, आमदार देवेंद्र भुयार, आमदार बळवंत वानखडे, आमदार प्रताप अडसड, आमदार राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त संजय निपाने आदी या वेळी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजनेत सन २०२०-२१ साठी २१९ कोटी १८ लाख रुपये नियतव्यय असून, अधिक विकासकामे व अपेक्षित अतिरिक्त निधी मागणीबाबत चर्चा या बैठकीत झाली. ग्रामीण व शहरी भागांतील विकासकामांसह विविध नावीन्यपूर्ण कामांचा अंतर्भाव जिल्हा नियोजनात करण्यात येईल. अधिकाधिक विकासकामे व्हावीत यासाठी निधी वाढवून मिळण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करू. प्रशासनानेही गतिमान होत कामे राबवावीत, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले.  पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, की प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामे झाली पाहिजेत. लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा अंतर्भाव नियोजनात करण्यात येईल. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी सकाळी साडेदहा वाजता लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विकास कामांविषयी बैठक घेण्यात येईल. त्या पुढे म्हणाल्या, की विकासकामांचा वेग वाढविण्यासाठी प्रशासनाकडूनही गती मिळणे गरजेचे आहे. कामातील हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. प्राप्त निधी वेळेत खर्च झाला पाहिजे. फास्ट फॉरवर्ड होत कामे करावीत. ग्रामपंचायत व इतर महत्त्वाच्या कार्यालयांच्या जुन्या व शिकस्त इमारती असतील, तिथे नवीन इमारती व गावोगाव अभ्यासिका उभारण्यासाठी निधी देण्यात येईल. गावे पाणीपुरवठा योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्पाशी सांगड घालण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल. तूर खरेदी केंद्रे तत्काळ सुरू करावीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com