Agriculture news in marathi Accelerate Kandebagh banana harvesting in Khandesh | Agrowon

खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली आहे. अनेक भागात केळीची मागणी वाढल्याने दरात मागील महिन्यातच सुधारणा झाली आहे.

जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली आहे. अनेक भागात केळीची मागणी वाढल्याने दरात मागील महिन्यातच सुधारणा झाली आहे. केळीला प्रतिक्विंटल ९०० ते १३०० रुपये दर मिळत आहे. 

आगाप कांदेबाग केळीची काढणी जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, यावल भागात सुरू आहे. तापी व गिरणा नदीकाठी या केळी बागा आहेत. तर, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात कांदेबाग केळीची काढणी सुरू आहे. केळीचे दर जुलैपर्यंत दबावात होते. केळीला एप्रिल ते जुलै यादरम्यान सरासरी ५०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. रावेर, यावल भागात तर ३०० रुपये प्रतिक्विंटल या दरातही केळीची खरेदी सुरू होती. केळीची आवक मे, जून व जुलैमध्ये मुबलक होती. 

दरम्यान, जिल्ह्यात मुक्ताईनगर, रावेर, यावल, जामनेर या भागात मिळून रोज २२० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची आवक झाली. ऑगस्टपासून केळीची आवक कमी झाली. ऑगस्टअखेर रावेर, यावल, मुक्ताईनगर या केळी पट्ट्यातील आवक १० टक्क्यांवर आली. यातच उत्तर भारतात केळीची मागणी वाढली. उत्तर भारतात दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मिर या भागात केळीची मागणी आहे. 

सध्या जळगावमधील चोपडा, यावल, जामनेर, पाचोरा, भडगाव, धुळ्यातील शिरपूर या भागात रोज १०० ते ११० ट्रक केळीची आवक सुरू आहे. दर्जेदार केळी या भागात उपलब्ध आहे. यामुळे केळीचे दर सुधारले आहेत. केळीला सरसकट १३०० रुपये  प्रतिक्विंटलचा दर मिळाला. दर यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत बरे आहेत. परंतु, मार्चमध्ये कांदेबाग केळीला वादळाचा फटका बसला. त्यामुळे केळी काढणीसाठी कमी उपलब्ध आहे. 


इतर अॅग्रो विशेष
‘गोकूळ’चे दूध आता टेट्रापॅकमध्येही...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (...
खाद्यतेल आयातशुल्क कपातीने सोयाबीन,...पुणे: केंद्र सरकारने खाद्यतेल आयातशुल्कात कपात...
कांदा लिलाव अखेर सुरूनाशिक: जिल्हा उपनिबंधकांनी तातडीने लिलाव सुरू...
केंद्र सरकार खाद्यतेल आयात शुल्क...नवी दिल्ली ः देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाचे...
कांदा खरेदीनंतर अवधीच्या निर्णयात गोंधळ...नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर...
सांगली बाजार समितीत हळदीची उलाढाल २८०...सांगली ः कोरोना विषाणूमुळे बाजार समित्या बंद...
मोसंबी फळपिक विमा अर्जात गारपीटीचा कॉलम...पुणे ः आंबिया बहारातील मोसंबी, डाळिंब,...
पुरानं आमचं जगणंच खरवडून नेलंयसोलापूर ः नदीकाठी शेत असल्यानं दरवर्षी ऊस करतो,...
गुणवत्तापूर्ण सीताफळ उत्पादन हेच ध्येयबाजारपेठेचा अभ्यास आणि योग्य नियोजन केल्यास...
स्पॉन, अळिंबी उत्पादनाचा ‘कोल्हापूर...शिरटी (ता.शिरोळ,जि.कोल्हापूर) येथील उच्चशिक्षित...
धुके पडण्यास प्रारंभ...पुणे ः परतीचा मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
मोह फुलांचा वाढेल गोडवाराज्यामध्ये ऐन नवरात्रीमध्ये मॉन्सून देवतेने...
देखो तो कहीं चुनाव है क्या?‘स रहद पर तनाव है क्या, देखो तो कहीं चुनाव है...
कांदा खरेदीनंतर व्यापाऱ्यांना मिळणार...नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर...
मराठवाड्यात साठ टक्के कपाशीवर गुलाबी...नांदेड : ‘‘मराठवाड्यात लवकर येणारे कापूस वाण...
कंपन्यांनी सर्वेक्षण न केल्यास विमा...पुणे: राज्यात विमा कंपन्यांनी पीक नुकसानीचे...
इथेनॉल दरात तीन रुपयांपर्यंत वाढकोल्हापूर : यंदाच्या हंगामात इथेनॉलनिर्मितीला गती...
एक लाख टन कांदा आयातीची शक्यतानवी दिल्ली ः देशातील कांदा दरवाढीवर नियंत्रण...
कापूस खरेदीसाठी तीस केंद्रे अंतिमनागपूर : गेल्या हंगामात नव्वद केंद्र आणि १५०...
फळ पीकविमा योजनेवर केळी उत्पादकांचा...जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत केळी...