खानदेशात कांदा काढणीला वेग

जळगाव : खानदेशात लाल कांद्याची काढणी सुरू झाली आहे. परंतु, काढणी सुरू होताच दरावर दबाव आला आहे. प्रतिक्विंटल १८०० ते २२०० रुपये, असे दर आहेत. दर कमी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
Accelerate onion harvesting in Khandesh
Accelerate onion harvesting in Khandesh

जळगाव : खानदेशात लाल कांद्याची काढणी सुरू झाली आहे. परंतु, काढणी सुरू होताच दरावर दबाव आला आहे. प्रतिक्विंटल १८०० ते २२०० रुपये, असे दर आहेत. दर कमी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

दर टिकून होते, त्या वेळेस अनेक शेतकऱ्यांनी काढणीची तयारी केली. परंतु, कांदा हवा तसा पक्व नव्हता. गेल्या आठवड्यात काढणीला सुरवात झाली. परंतु, खानदेशात धुळे, पिंपळनेर (ता.साक्री), जळगाव, चाळीसगाव, अडावद (ता.चोपडा), किनगाव (ता.यावल) येथील बाजारात दरात घसरण सुरू झाली.

सध्या जळगाव, धुळे येथील बाजारात कांद्याची प्रतिदिन मिळून अडीच हजार क्विंटल आवक सुरू आहे. लाल कांद्याची पूर्ण आवक आहे. पांढऱ्या कांद्याची आवक नाही.  नोव्हेंबरच्या मध्यानंतर सुमारे आठ ते १० दिवस जळगाव बाजार समितीत प्रतिदिन फक्त ३५० क्विंटल लाल कांद्याची आवक होती. परंतु, या महिन्याच्या सुरवातीलाच आवक वाढली. नोव्हेंबरमध्ये लाल कांद्याला जळगाव व धुळे बाजार समितीत प्रतिक्विंटल सरासरी २५०० रुपये दर होते. परंतु, या महिन्यात कमाल दरात घसरण दिसत आहे. 

चाळीसगावात आवक वाढीचा अंदाज 

जळगाव बाजार समितीत औरंगाबादमधील सिल्लोड, सोयगाव, जालना, जळगावमधील जळगाव, भुसावळ भागातून लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे.

चाळीसगाव येथील बाजारातही नाशिकमधील मालेगामधूनही कांदा येत आहे. कांद्याचे दर टिकून राहतील, अशी अपेक्षा होती. परंतु, दरात दिवसागणिक घसरण होत असल्याची स्थिती आहे. आवक चोपडा, यावल तालुक्यातून अधिक राहील. चाळीसगाव येथील बाजारातही अधिक आवक होईल, असा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com