खेडमध्ये बटाटा लागवडीस वेग

खेड तालुक्यात बटाटा लागवडीस सुरूवात झाली असून, पावसाने उघडीप दिल्याने बटाट्याच्या लागवडीस वेग आला आहे, पावसाची अनिश्चितता व वातावरणात होणाऱ्या बदलामुळे उत्पन्नावर होत असलेल्या परिणामामुळेबटाटा पिकांचे क्षेत्र कमी होत आहे.
खेडमध्ये बटाटा लागवडीस वेग Accelerate potato cultivation in Khed
खेडमध्ये बटाटा लागवडीस वेग Accelerate potato cultivation in Khed

चास, जि. पुणे : खेड तालुक्यात बटाटा लागवडीस सुरूवात झाली असून, पावसाने उघडीप दिल्याने बटाट्याच्या लागवडीस वेग आला आहे, पावसाची अनिश्चितता व वातावरणात होणाऱ्या बदलामुळे उत्पन्नावर होत असलेल्या विपरीत परिणामामुळे गेल्या काही वर्षांपासून खरीप हंगामात बटाटा पिकांचे क्षेत्र कमी होत असल्याचे कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.  पावसाची अनिश्चितता व वातावरणात झपाट्याने होणाऱ्या बदलामुळे खरीप हंगामात बटाटा पिकापासून तुलनेने कमी उत्पन्न मिळते, बटाटा बियाणे उपलब्ध होण्यात अडचणी, बटाटा बियाणाचे वाढलेले दर व बियाणात होणारी फसवणूक पाहता बटाटा पिकापेक्षा सोयाबीन सारखे पीक जास्त उत्पन्न देते, या शिवाय त्याचा उत्पादन खर्चही कमी असल्याने गेली काही वर्षांपासून बटाटा पिकाकडे काणाडोळा केला जात आहे. गेल्या काही वर्षांत सातत्याने खरीप हंगामात बटाटा पिकाचे झपाट्याने कमी होते आहे, यासाठी कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. २०१८-१९मध्ये खेड तालुक्यात बटाटा पिकाचे क्षेत्र ५३५० हेक्टर होते, ते २०१९-२० मध्ये ५१९२ हेक्टर झाले, तर २०२०-२१मध्ये ते थेट ३३०९ हेक्टरवर आले, चालू वर्षी त्यातही घट होण्याची शक्यता आहे.  बटाटा लागवडीसाठी लागणारे भाग भांडवल, मोठ्या प्रमाणावर लागणारे मनुष्यबळ व जमिनीची सुपीकता पाहता तुलनेत मोठे शेतकरी आज खरीप हंगामात बटाटा लागवड करताना दिसत आहेत. सद्यःस्थितीत बहिरवाडी येथे शेतकरी एकमेकांना मदत करून बटाटा लागवड मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. येथील प्रगतशील शेतकरी दादाभाऊ बोऱ्हाडे यांच्या शेतात बटाटा लागवड सुरू आहे. बोऱ्हाडे म्हणाले, ‘‘बटाटा लागवडीस मोठ्या प्रमाणावर भांडवल व मनुष्यबळाची गरज असते, शेतमजुरांची कमतरता असल्याने एकमेकांच्या मदतीने (सावड पद्धतीने) बटाटा लागवडी केल्या जात आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com