Agriculture news in marathi Accelerate pre-kharif cultivation in Nagar district | Agrowon

नगर जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या कामांना वेग 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 मे 2021

एकीकडे कोरोनाचे सावट असताना ग्रामीण भागातील शेतकरी खरीपपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. शेतातील काडीकचरा गोळा करणे, तो पेटवून देणे, नांगरणी, शेणखत टाकणे आदी कामांना वेग आला आहे.

नगर : एकीकडे कोरोनाचे सावट असताना ग्रामीण भागातील शेतकरी खरीपपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. शेतातील काडीकचरा गोळा करणे, तो पेटवून देणे, नांगरणी, शेणखत टाकणे आदी कामांना वेग आला आहे. भर उन्हात, तोंडावर आलेल्या खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी शेतात राबताना दिसत आहेत. 

नगर जिल्ह्यत कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावत असल्याने प्रशासनाने लागू केलेल्या निर्बंधांमुळे कुटुंबातील बहुतांश व्यक्ती घरात बसून होत्या. मात्र ग्रामीण भागात शेतीची कामे करण्यास प्रशासनाचे निर्बंध नसल्याने कुटुंबातील सर्व सदस्य शेतात मशागतीच्या कामासाठी सरसावले आहेत. त्यामुळे एकीकडे मजुरांची टंचाई, वाढलेली मजुरी, डिझेलची दरवाढ यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढला असला, तरी कुटुंबातील सदस्य मागील वर्षीच्या कपाशीच्या पळ्हाट्या उपटून जमा करणे, काडीकचरा गोळा करणे, तो पेटवून देणे, नांगरणी करणे या कामात व्यग्र आहेत. 

नगर जिल्ह्यात कपाशीची लागवड अधिक असते. गेल्या वर्षी ४० हजार हेक्‍टरवर कपाशीची लागवड केली गेली. मात्र अतिवृष्टीमुळे कपाशीसह खरिपाच्या सर्वच पिकांना मोठा फटका बसल्याने, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले होते. या वर्षीही पावसाच्या अनुकूल स्थितीच्या शक्‍यतेमुळे कपाशी व इतर खरीप पिकांमध्ये मोठी वाढ होणार असल्याचे दिसत आहे. लवकर पाऊस पडून खरिपाच्या पेरण्या, लागवडीला सुरुवात होण्याचे गृहीत धरून कामांची लगबग सुरू आहे.  
 


इतर बातम्या
विदर्भात मुसळधारेची शक्यता पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे...
सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेला गती...पुणे ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना...
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे...सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या...
सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस;...पुणे ः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८...
राज्यात खरीप पेरणी तीन टक्केनगर ः राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या...
मराठा आरक्षणासाठी एकत्रित लढणारकोल्‍हापूर : इथून पुढील काळात कोणत्याही...
खानदेशात युरियाची टंचाईजळगाव : खानदेशात खरिपास हवी तशी सुरुवातदेखील...
दूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
विदर्भात पावसाचा जोर वाढणारपुणे : राज्यातील बहुतांशी भागात उन्हासह अंशतः...