Agriculture news in marathi Accelerate purchase of seeds and fertilizers in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात बियाणे, खते खरेदीस वेग

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जून 2020

औरंगाबाद : पावसाने हजेरी लावली. कपाशीच्या मान्सून पूर्व लागवडीसह पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना व बियाणे, खते खरेदीला वेग आला आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील सोयगाव, देगलूर, बिलोली, धर्माबाद हे चार तालुके वगळता सर्व तालुक्यात सोमवारी (ता.१) पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेत शिवारातील लगबग वाढली. कपाशीच्या मान्सून पूर्व लागवडीसह पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना व बियाणे, खते खरेदीला वेग आला आहे. 

मराठवाड्यातील लातूर व औरंगाबाद या दोन कृषी विभागाअंतर्गत आठ जिल्ह्यांत जवळपास ४८ लाख १९ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी अपेक्षित आहे. त्यामध्ये सर्वाधिक २० लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीनचे या पाठोपाठ १५ लाख हेक्टर कापूस, जवळपास ३ लाख हेक्‍टर मका, ४ लाख ५९ हजार हेक्टर तूर, १ लाख ५४ हजार हेक्‍टर मूग, १ लाख ५० हजार हेक्‍टर उडीद, १ लाख १४ हजार हेक्‍टर ज्वारी आदी प्रमुख पिकांची पेरणी अपेक्षित आहे. 

सोमवारी (ता.१) सकाळपर्यंतच्या चोवीस तासात उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुकाअंतर्गत येत असलेल्या वालवड मंडळात सर्वाधिक ७० मिलिमीटर पाऊस झाला. त्यापाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील वैजापूर मंडळात ६७ मिलिमीटर पाऊस झाला. मराठवाड्यातील वैजापूर, पाथरी, भूम, माजलगाव तालुक्यात सरासरी ३० मिलिमीटरच्या पुढे पाऊस झाला. तर, वाशी, परळी, वडवणी, आष्टी, अंबड, गंगापूर, पैठण तालुक्यात सरासरी २० ते ३० मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. 

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात सर्वाधिक सरासरी ४२.३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. काही ठिकाणी दमदार स्वरुपाच्या झालेल्या पावसामुळे उन्हाळ्यातील मशागती झालेल्या शेतांमध्ये पेरणीपूर्व कोळपणीची कामे शेतकऱ्यांनी हाती घेतली आहेत. अनेक ठिकाणी वादळासह आलेल्या या पावसाने आंबा पिकाचे मोठे नुकसान केले. काही ठिकाणी रस्त्यालगतच्या झाडे वादळाने उन्मळून पडली. अनेकांच्या घरावरील टिनपत्रे वादळाने उडून गेले. परंतु, काही ठिकाणी नुकसान करणाऱ्या पावसाने पेरणीपूर्व मशागतीच्या कामासह बियाणे व खते खरेदीच्या कामाला वेग देण्याचे काम केले आहे. 

घरच्या सोयाबीनची चाचणी 

सोयगाव तालुक्यातील तिडका शिवारात आले. कृषी विद्यापीठाच्या तज्ञांसह विविध व्यासपीठाद्वारे कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन मार्गदर्शनातून यंदाच्या खरिपाचे नियोजन करण्याचे काम शेतकरी करतो आहे. खरिपाची सोय लावण्यासाठी पीक कर्ज मागणीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रशासनाच्या आवाहनालाही प्रतिसाद देण्यासाठी शेतकऱ्यांची अनेक सुविधा केंद्रावर गर्दी पाहायला मिळते आहे. अनंत अडचणींचा सामना करूनही शेतकरी मोठ्या आशेने खरिपाच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे. सोयाबीनचे घरचे बियाणे वापरण्यासाठी त्याची उगवण क्षमता तपासण्याचे काम शेतकरी करीत आहेत. 
 


इतर ताज्या घडामोडी
पुणे शहरालगतच्या रुग्णालयांमधील ८०...पुणे  : शहरालगतच्या गावांमध्ये कोरोनाबाधित...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...
शेळ्या, मेंढ्यांचे बाजार सुरु करण्याची...नगर  ः सध्या आषाढ महिना सुरु असून या...
गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी...भंडारा   : गोसेखुर्द प्रकल्प २०२३...
खासगी दूध संघांनी दुधाला २५ रुपये दर...नगर ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादन अडचणीत...
नांदेड जिल्ह्यात ९२ टक्के क्षेत्रावर...नांदेड ः यावर्षीच्या (२०२०) खरीप हंगामात नांदेड...
नगर जिल्ह्यात युरियाची टंचाई कायम नगर  ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना...
नगर जिल्ह्यात युरिया टंचाई कायमनगर ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना युरिया...
पुणे विभागात खरिपाचा सव्वासात लाख...पुणे ः जूनच्या सुरुवातील पुणे विभागातील अनेक...
आमगाव खडकी गावाने सहायता निधीला मदत देत...वर्धा  ः गावातील मार्गावरुन जाणाऱ्या...
लासलगाव बाजार समितीत आजपासून शेतमालाचे...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात...
औरंगाबादेत २४ लाख क्विंटल कापूस खरेदीऔरंगाबाद : जिल्ह्यात कापूस पणन महासंघ (सीसीआय),...
नांदेड, परभणी, हिंगोलीत हरभऱ्याची...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
गुजरातमधील अवैध एचटीबीटी उत्पादनाला...नागपूर ः बीटी नंतर एचटीबीटी (तणनाशक सहनशील)...
खाजगी दुध संघांनी दूधाला २५ रुपये दर ...नगर  ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादक...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळीकोल्हापूर : दिल्ली सरकारने शंभर युनिटपर्यंतचे वीज...
पुणे विभागात खरिपाची सात लाख ३४ हजार...पुणे   ः जूनच्या सुरूवातील पुणे...
पुण्यात सर्वच भाजीपाल्याच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
अन्नधान्यासह हाताला काम मिळणे गरजेचे ः...नाशिक : आपली अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक...
तापमान वाढीची प्रक्रिया रोखण्यासाठी...ओस्लो (नॉर्वे) येथील ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल...