Agriculture news in marathi Accelerate the purchase while giving the right price to cotton | Agrowon

कापसाला योग्य भाव देण्यासोबतच खरेदीची गती वाढवा 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 मे 2020

चंद्रपूर ः राज्यात कापूस खरेदीला परवानगी देण्यात आली असली तरी त्याची गती मंद आहे. त्यामुळे कापूस खरेदीची गती वाढवावी त्याकरिता केंद्रांच्या संख्येत वाढ करावी, अशी मागणी राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष अब्दुल एजाज कुरेशी यांनी केली आहे. 

चंद्रपूर ः राज्यात कापूस खरेदीला परवानगी देण्यात आली असली तरी त्याची गती मंद आहे. त्यामुळे कापूस खरेदीची गती वाढवावी त्याकरिता केंद्रांच्या संख्येत वाढ करावी, अशी मागणी राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष अब्दुल एजाज कुरेशी यांनी केली आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविलेल्या या संदर्भाने निवेदन पाठविण्यात आले असून त्याव्दारे ही मागणी करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांसमोरील संकटात वाढ झाली आहे. हंगाम तोंडावर असताना देखील त्यांना शेती कामे प्रभावीपणे करणे शक्‍य होत नाहीत. त्यामध्ये पोलिसांकडून होणाऱ्या अडवणुकीचा प्रश्‍न गंभीर आहे. 

दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर कापूस शिल्लक आहे. परंतु खरेदी केंद्राची संख्या अत्यल्प असल्याने या कापसाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना बराच कालावधी लागणार आहे. खरेदीची गती अशीच संथ राहिल्यास या वर्षाअखेरच खरेदी पूर्ण होईल, अशी भीती आहे. ही बाब लक्षात घेता खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्याची गरज आहे. कापूस केंद्राची जेमतेम संख्या आणि खरेदीची मंद गती याचा फायदा व्यापारी स्तरावर घेतला जात आहे. 

शेतकऱ्यांना हंगामासाठी पैसा लागणार हे जाणून घेत व्यापारी कापसाला दीड हजार ते ४२०० रुपये इतका दर देत आहेत. कापसाचे हमीभाव ५५५० रुपये असल्याने या माध्यमातून शेतकऱ्यांचे शोषण करण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांव्दारे होत असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे कापसाला योग्य भाव मिळावा याकरीता शासनस्तरावरुन प्रयत्न करावे, अशी मागणीही श्री. कुरेशी यांनी केली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...