मराठवाडा विभागातील ऊस गाळप हंगामाला गती

औरंगाबाद : नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना व बीड या पाच जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम हळूहळू गती पकडतो आहे.
Accelerate sugarcane crushing season in five districts
Accelerate sugarcane crushing season in five districts

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालय अंतर्गत येत असलेल्या नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना व बीड या पाच जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम हळूहळू गती पकडतो आहे. या पाच जिल्ह्यांतील १९ कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपात सहभाग नोंदविला आहे. मंगळवारपर्यंत (ता. २४) या सर्व कारखान्यांनी १३ लाख ६७ हजार १० टन उसाचे गाळप केले आहे.

यंदा मराठवाड्यातील प्रादेशिक सहसंचालक (साखर) औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यातील जवळपास २२ साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगामासाठी परवाना मिळण्याकरता अर्ज सादर केले होते. त्यापैकी जवळपास १९ कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपाला आजवर सुरवात केली आहे. १५ ऑक्टोबर पासून गाळप हंगामाला सुरवात झाली असून जवळपास १ लाख ४२ हजार हेक्टरवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध असणार आहे. 

यंदाच्या हंगामात जालना व बीड जिल्ह्यातील गेवराई परिसरात अतिरिक्त उसाचा प्रश्न उभा राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यंदा औरंगाबाद जिल्ह्यातील ६, जालन्यातील ४, बीडमधील ६ जळगाव मधील १ व नंदुरबार मधील २ मिळून १९ कारखाने प्रत्यक्ष उसाचा गाळप करीत आहेत. या सर्व कारखान्यांनी १३ लाख ६७ हजार १० टन उसाचे गाळप करत ७.०३ टक्के साखर उताऱ्याने ९ लाख ६१ हजार १७५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील दोन कारखान्यांनी ७६ हजार १८५ टन उसाचे गाळप करत ६.४५ टक्के  सरासरी उताऱ्याने ४९ हजार १७५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. जळगाव जिल्ह्यातील एका साखर कारखान्याने ५० हजार ९८५ टन उसाचे गाळप करत ३४ हजार १०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या कारखान्याचा साखर उतारा सरासरी ६.६९ टक्के राहिला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ६ कारखान्यांनी ३ लाख ३८ हजार ६०२ टन उसाचे गाळप करत ६.६३ टक्के साखर उतारा ने २ लाख २४ हजार ४४५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. 

जालन्यात ३ लाख टनावर ऊस गाळप  

जालना जिल्ह्यातील ४ कारखान्यांनी ३ लाख ६४ हजार ४४६ टन उसाचे गाळप करत सरासरी ७.३९ टक्के साखर उतारा ने २ लाख ६९ हजार ३८० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. तर बीड जिल्ह्यातील ६ कारखान्यांनी ५ लाख ३६ हजार ७९० टन उसाचे गाळप करत ७.१६ टक्के साखर उतारा ने ३ लाख ८४ हजार ७५ क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com